logo

प्रगतशील शेतकरी श्री गुरुनाथ सांबरे यांची युरोप(परदेश) शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी निवड.....

राज्य कृषी विभागामार्फत आयोजित सन २०२५-२६ शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्यासाठी कल्याण तालुक्यातील शेतकरी चळवळीतील प्रगतशील शेतकरी श्री गुरुनाथ सांबरे यांची युरोप शेती अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. दिनांक १६ ते २७ फेब्रुवारी २०२६ असा एकूण बारा दिवसांचा युरोप समूह परदेश अभ्यासदौरा आहे.
या दौऱ्यामध्ये युरोप समूहातील फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड या देशातील फलोत्पादन, दुग्धोत्पादन, पुष्पोउत्पादन , कृषिमाल प्रक्रिया, या देशातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, शेतमालाची निर्यात, कृषिमालाचे पणन,बाजारपेठेतील मागणी याबरोबरच त्या देशामध्ये उपयोगात येत असलेले अद्यावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर व शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी याची माहिती व त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी संबंधित संस्थांना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना राबविण्यात येत आहे.
यासाठी युरोप समूहातील जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड येथील शेती आभास दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून एकूण ५३ शेतकऱ्यांची तर कोकणातून ०८ शेतकऱ्यांची निवड झाली असून कल्याण तालुक्यातील पोई गावचे प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी श्री गुरुनाथ सांबरे यांना हा बहुमान मिळाला आहे. यासाठी त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

109
8925 views