नायगाव येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला प्रारंभ
धाराशिव : प्रतिनिधी - विकास वाघ. कळंब तालुक्यातील नायगांव येथे प्रतिवर्षाप्रमाणे वै गुरुवर्य ह.भ.प.हरिभाऊ महाराज सुगांवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भागवत हरिभाऊ पाटील यांच्या शेतातील वै ह.भ.प. हरिभाऊ महाराज सुगांवकर यांच्या समाधी समोर दि १२ गुरूवार ते दि १८ बुधवार अखंड हरिनाम सोहळ्याला प्रारंभ होत आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्त व शिष्य भजनी मंडळींनी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या सोहळ्यात विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, हरिजागर,काकडा आरती व भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रवचनकार ह,भ,प, कुलदिप महाराज नायगांव, ह,भ,प, लिंबराज महाराज पाडे पिंपरी, ह,भ,प,सखाहरी महाराज पालकर सौंदना, ह,भ,प, आचार्य सुरेशानंदजी महाराज हिमालय हरिद्वार, ह,भ,प, दिनेश महाराज एकुरगा, ह, भ, प, बळीराम महाराज औताडे पिंपळगाव, किर्तनकार आहे ह, भ, प,महादेव महाराज बोराडे औरंगपुरा, ह,भ,प, बळीराम महाराज काळे सुगावकर, ह भ प अच्युत महाराज पुरी सोलापूर, ह भ प दत्ता महाराज अंबिरकर डिकसळ, ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख पंढरपूर, ह भ प किशोर महाराज सुर्यवंशी आरजखेडा, तसेच दि १८ बुधवार रोजी काला किर्तन ज्ञानसिंधू गुरुवर्य ह भ प संदिपान महाराज हसेगांवकर यांचे होणार आहे तरी परिसरातील सर्व भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन भागवत हरिभाऊ शितोळे पाटील व बालासाहेब शिंदे चाकुर व भजनीं मंडळ नायगांव यांच्यावतीने करण्यात आले आहे.