logo

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा

नांदेड, Safer Internet Day हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जगभर साजरा केला जातो. यावर्षी “Smart Tech, Safe Choices – Exploring the Safe and Responsible Use of Artificial Intelligence (AI)” या संकल्पनेखाली १० फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमादरम्यान जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रदीप डुमणे यांनी सुरक्षित इंटरनेट वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) सुरक्षित व जबाबदार वापर, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा योग्य वापर, ओटीपी व पासवर्ड सुरक्षिततेचे महत्त्व तसेच डिजिटल स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले.

यापूर्वी शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, नांदेड येथे आयोजित कार्यक्रमातील अनुभवांच्या आधारे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्यावर भर देण्यात आला.

या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सुरक्षित इंटरनेट दिवसाच्या निमित्ताने Safe and Secure Use of AI बाबत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रतिज्ञा घेण्यात आली.

या उपक्रमाचा उद्देश शासकीय कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षिततेबाबत सजग करणे तसेच दैनंदिन शासकीय कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित व जबाबदार वापर सुनिश्चित करणे हा होता.

0
68 views