
काहीजण 120 रुपयांना तर काही 150 रुपयांना विकतात, ट्रेनमध्ये मिळणाऱ्या थाळीची खरी किंमत किती......?
IRCTC Veg Thali.....दुरवरच्या अंतरावर जाण्यासाठी सर्वजण रेल्वेचा वापर करतात. खाण्यापिण्याची चांगली सोय रेल्वेमध्ये असते. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होतो. दरम्यान भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करताना खाण्याच्या थाळ्या वेगवेगळ्या किंमतीत विकल्या जातात. ज्यामुळे विक्रेते आणि प्रवाशांमध्ये भांडणे होतात. सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होतात ज्यात विक्रेते थाळीसाठी कधी 120 रुपये तर कधी किंवा 150 रुपयांपर्यंत मागताना दिसतात.
चहा आणि कॉफीच्या किंमती
ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर चहा घेणे हे सामान्य आहे. सामान्य चहाची किंमत ट्रेन आणि स्टेशन दोन्ही ठिकाणी 5 रुपये आहे. टी-बॅग वाली चहा 10 रुपयांची आहे. कॉफी देखील 10 रुपयांची मिळते. ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीनमधून येणारी चहा किंवा कॉफी 10 रुपयांची असते. या किंमती IRCTC ने ठरवलेल्या आहेत, ज्यामुळे विक्रेते जास्त पैसे घेऊ शकत नाहीत. प्रवाशांनी या किंमती लक्षात ठेवून खरेदी करावी, असा सल्ला देण्यात येतोय.
नाश्त्याच्या किंमती
सकाळच्या नाश्त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कटलेट ट्रेनमध्ये 40 रुपये आणि स्टेशनवर 35 रुपयांचा मिळतो. इडली, वडा, उपमा किंवा पोंगल हे सर्व 40 रुपयांचे आहेत, ट्रेन आणि स्टेशन दोन्ही ठिकाणी. ऑमलेटची किंमत ट्रेनमध्ये 50 रुपये तर स्टेशनवर 45 रुपये आहे. या वस्तूंच्या किंमती IRCTC ने निश्चित केल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना योग्य दरात चांगला नाश्ता मिळू शकतो. विक्रेते यापेक्षा जास्त किंमत मागू शकत नाहीत.
थाळीची अधिकृत किंमत
थाळीची अधिकृत किंमत 80 रुपये निश्चित केली आहे. स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये किंमती वेगळ्या आहेत – स्टेशनवर 10 रुपये कमी, तर ट्रेनमध्ये 10 रुपये जास्त. मेल, एक्सप्रेस, हमसफर, राजधानी, शताब्दी, दुरंतो, गतिमान, वंदे भारत आणि तेजस ट्रेनसाठी वेगळ्या किंमती आहेत. बहुतेक ट्रेनमध्ये मेनू एकसारखाच असतो, ज्यामुळे प्रवाशांना फसवणे कठीण होते.
थाळी आणि जेवणाच्या मुख्य किंमती
मुख्य जेवणासाठी वेज थाळी ट्रेनमध्ये 80 रुपये आणि स्टेशनवर 70 रुपयांची आहे. वेज बिर्याणी देखील त्याच किंमतीत मिळते. नॉन-वेज पर्यायात एग करी थाळी 90 रुपयांची असते, तर चिकन करी थाळी 130 रुपयांची. या किंमती IRCTC ने ठरवलेल्या आहेत आणि विक्रेते यापेक्षा जास्त घेऊ शकत नाहीत. प्रवाशांनी थाळीचे घटक तपासून घ्यावेत, जसे की भात, चपाती, भाजी इत्यादी, जेणेकरून पूर्ण मूल्य मिळेल.
कशी कराल तक्रार?
जर विक्रेता जास्त किंमत मागत असेल किंवा खाणे न देऊन फसवत असेल, तर प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन 139 वर तक्रार करावी. यामुळे समस्या लगेच सोडवली जाते आणि विक्रेत्यावर कारवाई होते. IRCTC च्या नियमांनुसार, प्रवाशांनी नेहमी अधिकृत किंमती द्याव्यात आणि जास्त पैसे देऊ नयेत.