logo

धक्कादायक ! प्रसिद्ध उद्योजकाने स्वतःवर गोळी झाडून केलं ठार; ऑफिसात IT रेड पडताच संपवलं जीवन, राज्य हादरलं......

प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी कॉन्फिडंट ग्रुपचे चेअरमन आणि उद्योजक सीजे रॉय यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्याच कार्यालयात टोकाचं पाऊल उचललं. ते 57 वर्षांचे होते. महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी आत्महत्या केली तेव्हा कार्यालयात आयकर विभागाने धाड टाकली होती. कार्यालयात आयकर विभागाचे अधिकारी तपास करत असतानाच सीजे रॉय यांनी आपल्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस यासंदर्भात सविस्तर तपास करत आहेत.

यापूर्वी गुरुवारी सकाळी आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकले होते. या छाप्यांदरम्यान, त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा त्यांच्याकडे अधिक मालमत्ता असल्याचे कथितरित्या उघड झाले होते. एक प्रमुख रिअल इस्टेट डेव्हलपर असलेला कॉन्फिडेंट ग्रुप दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये, विशेषतः केरळ आणि कर्नाटकमध्ये कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीजे रॉय यांनी अशोकनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लैंगफोर्ड टाऊनमधील आपल्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना एचआरएस लेआऊटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, मृतदेह अनेकल येथील नारायण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करचुकवेगिरीच्या संदर्भात आयकर (आयटी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॉन्फिडंट ग्रुपच्या कार्यालयावर छापा टाकला होता. ही चौकशी सुरू ठेवत अधिकाऱ्यांनी आज कॉन्फिडंट ग्रुपच्या कार्यालयावर छापा टाकला.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, कॉन्फिडंट ग्रुप हा केरळमधील एक टॉप बिल्डर आहे. तो कोची, तिरुवनंतपुरम, त्रिशूर, कालिकत, कोट्टायम आणि बंगळुरू येथे लक्झरी फ्लॅट आणि अपार्टमेंट प्रोजेक्टवर काम करतो. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सीजे रॉय यांना आवडायच्या मारुती कार
सीजे रॉय हे कॉन्फिडंट ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष होते, जे रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतलेले होते. त्यांनी 1994 मध्ये त्यांची पहिली मारुती 800 खरेदी केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तो शोधली आणि 27 वर्षांनंतर त्यांनी 10 लाखांना खरेदी केली. त्यांच्याकडे रोल्स-रॉइस, फेरारी आणि कोएनिगसेग यासारख्या लक्झरी कारचा संग्रह होता, परंतु मारुती त्यांची आवडती वाटत होती.

172
1904 views