logo

स्प्लेंडिड हॉलिडेजचे संचालक श्री. रणधिर शिंदे यांना पर्यटन उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यस्तरीय “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन” पुरस्कार प्रधान......

जानेवारी सोमा वाईन व्हिलेज, नाशिक येथे रिसेल डॉट.इन या संस्थेच्या वतीने कल्याण येथील रॉयल स्प्लेंडिड हॉलिडेजचे संचालक श्री. रणधिर शिंदे यांना पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यस्तरीय “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात २७ वर्षे सेवा बजावून मुख्याध्यापक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर श्री. रणधिर शिंदे यांनी कल्याण येथे रॉयल स्प्लेंडिड हॉलिडेज या नामांकित पर्यटन संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत भारतातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळांसह परदेशातील युरोप व आशिया खंडात किफायतशीर दरात नियमितपणे यात्रा आयोजित केल्या जातात.
ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष सुरक्षित आणि नियोजनबद्ध यात्रा हे या कंपनीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तसेच EBC (एव्हरेस्ट बेस कॅम्प) थ्री पासेस या आव्हानात्मक ट्रेकचे सुरक्षित व किफायतशीर आयोजन करणारी महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन संस्था म्हणून रॉयल स्प्लेंडिड हॉलिडेजची विशेष ओळख आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रिसेल डॉट.इन या उद्योजक संस्थेने श्री. रणधिर शिंदे व त्यांच्या पर्यटन संस्थेचा “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन” पुरस्काराने गौरव केला.

138
3211 views