logo

भाथीजी महाराज माध्यमिक विद्यालय काकडखूंट येथे व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह उत्साहात संपन्न

अक्कलकुवा प्रतिनिधी: गंगाराम वसावे
भाथीजी महाराज माध्यमिक विद्यालय काकडखुंट,तालुका - अक्कलकुवा , जिल्हा - नंदुरबार विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना करिअरविषयी योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.विजय कापडे सर होते.
कार्यक्रमास श्री.सुरेश तडवी सर,श्री.कैलास झाल्टे सर हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी श्री.सुरेश तडवी सर यांनी भविष्यातील करिअर निवड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार व्यवसाय निवडावा, सातत्याने प्रयत्न व मेहनत केल्यास यश नक्की मिळते, असे त्यांनी प्रतिपादन केले. श्री.कैलास झाल्टे सर यांनी करियर कसे निवडावे या बद्दल माहिती दिली अध्यक्षीय भाषणात श्री.विजय कापडे सर पारंपरिक व्यवसाय आधुनिकतेने कसे करावेत व सध्याच्या काळातील बदलते व्यवसाय या संदर्भात मार्गदर्शन केले . व्यवसाय मार्गदर्शन सप्ताहामुळे विद्यार्थ्यांना नवीन व्यवसाय संधी ओळखणे सोपे जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सदर कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी श्री. कोबीदास वसावे व श्री.सुनील झाल्टे यांनी परिश्रम घेतले.

44
3389 views