logo

आंबेडकरी पक्षाना बसला मोठा धक्का एकानेही भोपळा फोडला नाही...


मुंबई... मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने मोठी माजी मारली, तर एमआयएमनेही आठ जागा जिंकत राज्याचे लक्ष्य वेधून घेतले. पण, या साऱ्यात आंबेडकरी पक्षांना मात्र मोठा फटका बसल्याचे दिसून आले. मुंबईची निवडणूक लढवलेल्या ८ पैकी एकाही आंबेडकरी पक्षाला भोपळा फोडता आला नाही.
वंचित बहुजन आघाडीला रिपाइं-खोरीप गट।
कोण किती जागा लढले
रिपाई (आठवले)।
११
वंचित
४५
बसप
७८
रिपब्लिकन

पीपल्स पक्ष

आझाद पार्टी
१६
बरिसो पार्टी
५ १ अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यात ३० जागांवर विजय मिळाला असला तरी मुंबईत काँग्रेसबरोबर आघाडीत ४१ जागा लढवूनही एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. धक्कादायक म्हणजे मुंबईत ८ आंबेडकरी विचारांचे पक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, यातील एकाही पक्षाला यावेळी एकही जागा जिंकता आली नाही.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाईने ११, अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने ४५, मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने ७८, आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने ५, प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने २, चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद पार्टीने १६, डॉ. सुरेश माने यांच्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने ५ आणि रिपाइं-खोरीप गटाने एक अशा १६४ जागा लढविल्या होत्या.

आठवले यांच्या रिपाइंने स्वबळावर उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. तर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने काँग्रेस आघाडीत सर्व जागा लढवल्या होत्या. प्रा. जागेंद्र कवाडे यांची पीआरपी ही शिवसेना-शिंदे गटाबरोबर होती. मात्र, यापैकी एकाही पक्षाला मुंबईत एकही जागा जिंकता आली नाही. मुंबईत अनुसूचित जात प्रवर्गासाठी १५ मतदारसंघ आरक्षित आहेत. या सर्व १५ मतदारसंघामध्ये बड्या पक्षांनी बाजी मारली आहे.

311
1552 views