logo

लातुर येथील अमानुष घटनेबद्दल लहुजी शक्ती सेना उमरगा तालुक्याच्यावतीने निवेदन सादर


( जिल्हा प्रतिनिधी -विकास वाघ धाराशिव)
लातूर येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीतील कु.अनुष्का किरणकुमार पाटोळे या अल्पवयीन विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट व इतर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा लहुजी शक्ती सेना उमरगा तालुक्याच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असे निवेदन लहुजी शक्ती सेना उमरगा तालुक्याच्यावतीने मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई. मार्फत मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय उमरगा यांना दिनांक 12/1/2026 रोजी देण्यात आले.
त्यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष- शिवाजी भाऊ गायकवाड, जिल्हा अध्यक्षा- सारिका ताई कांबळे, मराठवाडा उपाध्यक्ष- राजाभाऊ शिंदे, मराठवाडा उपाध्यक्षा- छायाताई नाईकवाडे, उमरगा तालुका अध्यक्ष- विजय भाऊ तोरडकर, तालुका अध्यक्षा- अलकाताई कांबळे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, रामभाऊ कांबळे, केशव भाऊ सरवदे, जोगेश्वरी शिंदे, पल्लवी गायकवाड, सुरेखा कांबळे, ज्ञानेश्वर पात्रे, रोहित वाघमारे, सविता बोईने, इंद्रजीत सूर्यवंशी, सुप्रिया शिंदे, प्रवीण गायकवाड, धर्मराज देडे, महादेव महाराज मोरे, धनराज गायकवाड (नगरसेवक नळदुर्ग) इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन पार्टीचे रामभाऊ गायकवाड, दत्ताभाऊ गायकवाड यांनी पाठिंबा जाहीर केला.

0
0 views