स्पर्धा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या आदिवासी उमेदवारांचे समुपदेशन शिबीर संपन्न*
नांदेड दि. 12 जानेवारी :- आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या कार्यालयातील स्पर्धा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना नुकतेच 8 जानेवारी रोजी समुपदेशन शिबीर उपक्रम कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र किनवट कार्यालयामार्फत राबविण्यात आले.यावेळी कौशल्य विकास विभागाचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरेश शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. जालना येथील मॉडेल करिअर सेंटरचे समुपदेशक डॉ. अमोल परिहार यांनी समुपदेशन शिबिराचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी सुदाम चव्हाण, लिपीक विष्णू राठोड, अक्षय राठोड यांनी सहकार्य केले. शेवटी प्रा. नवनीत चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.