logo

३१डिसेबरपर्यत गाळपासाठी आलेल्या ऊसाचे बिल संक्रांत सणानिमित्त २०० रुपये प्रमाणे १२ जानेवारी रोजी जमा करणार - चेअरमन नानासाहेब पाटील


जिल्हा प्रतिनिधी - विकास वाघ धाराशिव,
धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगर प्रा.लि या कारखान्यास 2025- 26 च्या गळीत हंगामात 31 डिसेंबर 2025 पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 2500 रुपयेप्रमाणे यापूर्वी जमा करण्यात आले आहे. तसेच संक्रांत सणा निमित्ताने बिलाचा हप्ता 200 रुपयेप्रमाणे सोमवार दि.12 जानेवारी 2026 रोजी बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे.

त्याचबरोबर दि.1 जानेवारी 2026 पासून 2700 प्रमाणे ऊस बिल संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबत कारखान्यामार्फत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की,  कारखान्याकडे गळीत हंगाम 2025-26 साठी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवाना, तोडणी वाहतुक ठेकेदाराचा करार केलेल्या संबधित ठेकेदारांना, शेतकी विभागातील कर्मचार्‍यानी या गळीत हंगामातील शेतकर्‍यांना दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ऊसास पहिला हप्ता म्हणून 2500/- प्रमाणे प्रत्येक पंधरवाडा संपल्यावर संबधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. संक्रात सणानिमित्ताने 200 /- प्रमाणे वार सोमवार दि. 12 जानेवारी 2026 रोजी संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

तसेच चालू गळीत हंगामामध्ये दि. 01 जानेवारी 2026 पासून 2700/- प्रमाणे ऊस बिल देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना योग्य ऊसभाव देण्याची परंपरा एनव्हीपी शुगर परिवार कायम ठेवणार आहे. याची सर्व कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार व शेतकी विभातातील कर्मचारी यांनी नोंद घ्यावी. तसेच जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

9
955 views