logo

हिंद की चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी* *सचखंड पब्लिक स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम*



नांदेड दि. 9 जानेवारी :- श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त “हिंद की चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.

या मोहिमेच्या अनुषंगाने आज नांदेड येथील सचखंड पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच भारताचा नकाशा करून हिंद दी चादर या गीताचे गायन देखील यावेळी केले आणि शहिदांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, शाळेच्या प्राचार्य अनिल कौर, चत्तर सिंग टंक, रणदीप सिंग पिरंगे, करणपाल सिंग लोणी वाले, भगेंद्रसिंग फौजी आदीची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी शाळा स्तरावर विविध स्पर्धा व उपक्रम राबवून “हिंद की चादर” कार्यक्रम व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये या ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रभात फेरी, विविध स्पर्धा, भाषण, रांगोळी आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याअनुषंगाने आज नांदेड येथील सचखंड पब्लिक स्कूल येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नांदेड येथे होणाऱ्या “हिंद की चादर” कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच हा कार्यक्रम समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आज सचखंड पब्लिक स्कूल शाळेच्या प्राचार्या अनिल कौर खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या संपूर्ण स्टाफच्या मदतीने विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा साकारला होता.गुरुबचन सिंग शिलेदार आयटीआय खालसाचे प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले.

2
48 views