logo

शिवसेना आणि बीजेपी महायुतीचे उमेदवार श्री मयुर पाटील , सौ. नमिता पाटील, सौ. पूजा जोगदंड, श्री रोहन कोट यांचा प्रचार दौरा ,

आंबिवली - प्रभाग क्र ०४ मधील शिवसेना आणि बीजेपी महायुतीचे उमेदवार श्री मयुर पाटील, सौ.नमिता मयुर पाटील, सौ पूजा अश्विन जोगदंड, श्री रोहन पांडुरंग कोट यांचा डोर टू डोर प्रचार दौरा आंबिवली मधील मोहिली गावात 7 जानेवारी रोजी केला. या प्रचारांमध्ये हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महायुतीचे उमेदवार आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी जयघोषणा देखील करण्यात आली. तर श्री मयूर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असे सांगितले की उद्यापासून त्यांची बैठका सभा बाईक रॅली रोडशो अशा प्रकारचे आयोजन प्रभाग क्रमांक चार मध्ये करण्यात येणार आहे. तसेच जनतेला देखील 15 जानेवारी रोजी आपल्या जवळ असलेल्या बोध मध्ये जाऊन चारही महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी वोट करून विजयी करा असे देखील जनतेला आव्हान श्री मयूर पाटील यांनी केले.

9
54 views