logo

अनिल केशव पवार आंबेडकरी विचारांनी प्रेरित परिवर्तनाचा प्रवासी.......


मुंबईच्या चेंबूरमधील पी एल लोखंडे मार्ग आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा परिसरच अनिल पवार यांच्या जन्माचा साक्षीदार एका साध्या चाळीत, सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाने संघर्षाला शस्त्र आणि सामाजिक परिवर्तनाला ध्येय बनवले बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बाळकडू त्यांना घरातून

आणि त्या चळवळीच्या पवित्र भूमीतूनच लाभलं गरिबीच्या कुशीत वाढलेला पण आत्मविश्वासाचा प्रकाश मनात पेटवलेला हा तरुण शिक्षण आणि रोजंदारी यांचा समतोल राखत पुढे गेला शाळेच्या सुट्ट्यांमध्ये काम करत शिक्षण पूर्ण केले आणि आज शेकडो लोकांना रोजगार देणारा यशस्वी उद्योजक म्हणून समाजात स्थान मिळवलं चार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेले अनिल केशव पवार हे मेहनत प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे प्रतीक ठरले आहेत

२००३ साली त्यांनी परिवर्तन युवा मंच या तरुणांच्या संघटनेची स्थापना केली आणि त्याच वर्षी परिवर्तन युवा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ची सुरुवात अध्यक्ष म्हणून केली. समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक मदत रोजगार व स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देणे हे त्यांच्या कार्याचं केंद्रबिंदू ठरलं

२००७ साली लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी रिपब्लिकन फ्रंटच्या तिकिटावर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली. सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच ठळक राहिला. भाजप सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्या निषेधार्थ घेतलेल्या आंदोलनात त्यांनी आघाडी घेतली होती त्यांच्या निर्भीड नेतृत्वाची ही जिवंत साक्ष आजही कार्यकर्त्यांना प्रेरणा देते

कामोठ्यात स्थायिक झाल्यानंतर अनिल पवार यांनी आपला सामाजिक वसा आणखी व्यापक केला गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी ११ लाखांपर्यंतचा अपघाती विमा तसेच सामाजिक भल्यासाठी अनेक उपक्रम राबवत ते आजही जनतेशी जोडलेले आहेत.

कामोठे कॉलनी फोरमचे मुख्य शहर संघटक म्हणून त्यांनी कर, पाणी, रस्ते आणि नागरिकांच्या प्रश्नांवर अनेक बैठकांचे आयोजन केले त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचल्या आणि ठोस तोडगेही निघाले.

अनिल केशव पवार

त्यांच्या नियोजन कौशल्याची झलक महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन रॅली दरम्यान दिसली पनवेल शहरात झालेली ही सर्वात मोठी रॅली ठरली आंबेडकरी चळवळीतील अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आजही कायम आहेत.

अनिल पवार हे केवळ सामाजिकच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी समाजनिर्मितीच्या कार्यात गुंतलेले आहेत. ते सम्यक बहुद्देशीय सेवा संस्था या संस्थेचे सचिव असून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कामोठ्यात सुपरमार्केट प्रकल्पाची निर्मिती केली आहे. तसेच Jobtech Hospitality and Management Services Pvt. Ltd. या

कंपनीमध्ये संचालक म्हणून कार्यरत राहून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत.

आज अनिल पवार हे कामोठे परिसरातील जनतेच्या हक्कासाठी लढणारे निःस्वार्थी आणि प्रबुद्ध विचारांचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते येत्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून नगरसेवक पदासाठी इच्छुक असून समाजसेवेच्या पुढील टप्प्याकडे दृढपणे वाटचाल करत आहेत

75
1976 views