logo

देविदास धर्मा गायकवाड यांना " फूलेप्रेमी संविधान दुत " आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.......


एस एम जोशी सभागृह नवि पेठ पुणे येथे दिनांक २ ते ५ जानेवारी २०२६ रोजी झाल्येल्या दुस-या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल पुणे- २०२६ साठी सोलापुरचे सन्मा. देविदास धर्मा गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड झाली होती .. तसेच या कार्यक्रमात त्यांनी संविधानाचा प्रचार , प्रसार व जागर व्हावा , यासाठी भारतिय संविधानावर आधारित स्वरचित एक गित ही सादर केले , त्यांच्या या साहित्यिक व सामाजिक चळवळीच्या योगदानासाठी , कार्यक्रमाचे आयोजक , कवी , शिक्षक, भिडेवाडाकार - सन्मा. विजय वडवेराव सर याच्या हस्ते , देविदास गायकवाड यांना " फुलेप्रेमी संविधान दुत " या आंतरराष्ट्रिय पुरस्कार , सन्मानचिन्ह , भारतिय संविधानाचे पुस्तक , पॅड व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले , या कार्यक्रामध्ये देशभरातुन अनेक साहित्यिक , कवी ,कवयित्री , लेखक , कलावंत , उपस्थित होते ,तसेच देविदास गायकवाड यांच्या या साहित्यिक यशाबद्दल त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्रपरिवार , नातेवाईक , अनेक साहित्यिक , कलावंत यांच्याकडून काैतुकांचा वर्षाव होत आहे ..

190
3521 views