वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसनंद गावातील जत्रेतील गर्दीमध्ये महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार घडला.
वाघोली (मारुती रणबावळे)वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसनंद गावातील जत्रेतील गर्दीमध्ये महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध वाघोली पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाघोली पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ३८, रा. वाघोली) या ६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळीच्या सातच्या सुमारास मौजे केसनंद गाव येथे भरवण्यात आलेल्या जत्रेमध्ये गेल्या होत्या. जत्रेत मोठी गर्दी असल्याने महिलेची नजर चुकवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे लक्षात आले, याप्रकरणी महिलेने दागिने चोरी झाल्याची तक्रार वाघोली पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे