मानसिक आरोग्य कायद्याचा* *लाभ रुग्णांना द्या : न्या. जाधव*
लातूर, दिनांक 29 : ‘मानसिक आजार ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. 'मानसिक आरोग्य कायदा-2017' चा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवून त्यांचे हक्क जपले पाहिजेत,’ असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. जाधव यांनी केले. लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित 'मानसिक आरोग्य आढावा मंडळाच्या' बैठकीत ते बोलत होते. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शीतल तळीखेडकर, अशासकीय सदस्य आर. बी. जोशी, आर. एम. क्षीरसागर आणि डॉ. सुधीर बनशेळकीकर उपस्थित होते. न्या. जाधव म्हणाले, समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. मंडळाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून रुग्णांना न्याय मिळवून द्यावा. यावेळी सदस्य सचिव डॉ. एस. व्ही. ढगे यांनी मंडळाच्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली. *स्वतंत्र कक्षाची स्थापना* आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयात या मंडळासाठी आता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.