logo

अभिजात आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात 'योगेश्वरी देवी' सर्वोत्कृष्ट स्थानिक माहितीपट........

अभिजात फिल्म सोसायटी व दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या अभिजात इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल चा पारितोषक सोहळा प्रसिद्ध लेखक बालाजी सुतार यांच्या हस्ते पार पडला. श्री योगेश्वरी देवीचा इतिहास संस्कृतिक महत्व देवीची उपासना, उत्सव समारंभ या सर्वांचे एकत्रित

वर्णन केले असून उत्कृष्ट ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल इफेक्ट लोककथा त्यावर आधारित अभिनय अशा सादरीकरण द्वारे माहितीपट तयार करण्यात आला आहे.

या योगेश्वरी देवी माहितीपटास अभिजात इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल कडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट स्थानिक माहितीपट पुरस्कार देण्यात आला.

हा पुरस्कार दिग्दर्शक दशरथ देशपांडे व सौ. किरण दशरथ देशपांडे यांनी स्वीकारला. हा माहितीपट मयूर फिल्म प्रोडक्शन यूट्यूब वाहिनीवर प्रदर्शित आहे.

या
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या लेखक बालाजी सुतार यांनी लघुपटातून मांडल्या जाणाऱ्या गोष्टीला अधिक महत्व असल्याचे अधोरेखित करत कुठल्याही व्यावसायिक अपेक्षाच ओझा नसलेलं लघुपट हे अतिशय नेमक आणि प्रखर गरजेच माध्यम आहे, अस मत व्यक्त केलं. तत्पूर्वी लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी महोत्सवात प्रेक्षकांशी संवाद साधला.

सुमारे 12 देशातून असलेल्या 19 भाषांमधील निवडक 100 लघुपट आणि माहितीपटाच प्रदर्शन या महोत्सवात झाले. परीक्षक म्हणून ठाणे येथील संतोष पाठारे, निलेश कुंजीर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास डॉ. मिलिंद पोतदार, प्रा. ओमप्रकाश झुरळे, अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, डॉ. विश्वास शेंबेकर, डॉ. स्वप्नील देशमुख, धनंजय कुलकर्णी, प्रा. शिवशंकर पटवारी, अभिषेक बुचके, प्रथमेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मधुसूदन कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. दुर्गा शर्मा यांनी मानले.

58
3696 views