logo

दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिलव २०२६ साठी. सोलापुरचे सुपुत्र देविदास धर्मा गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड......

वर्ण व्यवस्थेवर आपल्या प्रखर विचाराने घणघाती हल्ला करणारे पहिले सामाजिक बंडखोर , क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले , क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले , फातिमा शेख , ज्यांनी भारतिय संविधानतुन प्रत्येक स्री - पुरुषांना समतेचे व मानवतेचे सर्व अधिकार बहाल केले असे विश्वविख्यात, बुद्धिसम्राट, विश्वरत्न - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर , आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज ,यां महापुरुषांच्या महान विचारांचा प्रसार ,प्रचार ,व जागर व्हावा यासाठी पुण्यामध्ये दुसरे अंतरराष्ट्रिय फुले फेस्टिव्हल २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.. महापुरुषांच्या विचाराने प्रेरित असलेले प्रसिद्ध कवी / शिक्षक व संविधान दुत- सन्मा , विजय वडवेराव सर यानी या फेस्टिवलचे भव्य दिव्य असे आयोजन केले आहे..
या फेस्टिवलचे आयोजक विजय सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भुषविण्यासाठी सोलापुरचे सुपुत्र सन्मा - देविदास धर्मा गायकवाड यांना निवडपत्र देउन निमंत्रित केले आहे , यापूर्वी २०१९ मध्ये देविदास गायकवाड यांनी " महासुर्य " या. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय जीवनातील संघर्षावर अधारित मराठी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे ,
सिंधू धर्मा फिल्मस् निर्मित " महासूर्य " चित्रपटाचे ते स्व:ता निर्माते / दिग्दर्शक / लेखक व गितकार आहेत ,आजवर शिव ,फुले , शाहू, आंबेडकर यांच्यावर अनेक गिते लिहून त्यांनी समाजिक चळवळ बळकट करण्यासाठी आपल्या लिखाणातुन सतत ते समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत , "त्यागमुर्ती भिमाची रमा " हे नाटक लिहून व दिग्दर्शित करुन त्यांनी काहि ठिकाणी प्रयोग हि केले ,
या साहित्यिक व कलेच्या क्षेत्रात देविदास गायकवाड यांनी अनेक सन्माणपत्र व पुरस्कार प्राप्त करुन आपल्या साहित्यिक कलेचा ठसा उमटविला आहे ,
फुले फेस्टिवल हा जगाच्या ईतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावी असा एक अगळा वेगळा भव्य कार्यक्रम होणार आहे ,
हा कार्यक्रम
पुणे येथील एस , एम , ज्योशी फाऊंडेशन या सभागृहात दिंनाक - २ ते ५ जानेवारी पर्यत आयोजन करण्यात आलेले आहे , या फेस्टिवल मध्ये देशाभरातुन अनेक प्रसिद्ध फुलेप्रेमी व संविधान दूत कवी / कवयित्री व बाल कलावंतानी सहभाग नोंदविला आहे , तसेच देविदास गायकवाड यांना या फुले फेस्टिवलच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाल्यामुळे त्यांच्यावर अनेक नातेवाईक व मित्रपरिवारांच्या शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ,

55
1709 views