logo

संत निरंकारी मंडळाचे वतीने दिनांक २१ डिसेंबर रोजी सांगलवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन


संत निरंकारी मंडळाचे वतीने दिनांक २१ डिसेंबर रोजी सांगलवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.

संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन रजि दिल्ली शाखा सांगली यांचे वतीने रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सांगलवाडी येथील श्री हनुमान वाचनालय,तरुण मराठा भवन मारुती मंदिर जवळ सांगलीवाडी या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले आहे आध्यात्मिक जागृती बरोबर मानवाला मानव प्रिय असावा एकमेकांचा आधार बनावा या उक्तीप्रमाणे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, स्वच्छ जल स्वच्छ मन या उपक्रमाअंतर्गत जलसाठ्याची स्वच्छता करणे,नैसर्गिक आपत्ती पुरपरस्थितीच्या वेळी मदतकार्य पुरविणे असे अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवुन निरंकारी मिशन मानवाची सेवा करीत आहे या आरोग्य शिबिरासाठी बेळगाव येथील हृदयरोग तज्ञ डॉ पुरुषोत्तम अरोरा यांचेसह अनेक नामवंत डॉक्टर टीम उपस्थित राहणार आहेत तरी याचा इच्छुकांनी यांचा लाभ घ्यावा.
तसेच कळविताना विशेष आनंद होतो आहे की दिनांक २४ जानेवारी ते २७ जानेवारी २०२६ रोजी सांगलवाडी सांगली येथे ५९ व्वा महाराष्ट्र निरंकारी संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे याही अध्यात्मिक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा घेऊन मानव जन्माचे उद्दीष्ट साध्य करुन घ्यावे असे आवाहन सातारा& सांगली झोनचे झोनल इंचार्ज आदरणीय नंदकुमार झांबरे यांनी केले आहे.

0
35 views