SANTOSH KOSHTI, Sangli 19/03/2023 02:03 PM Edit Delete निरंकारी सद्गुरुंच्या दिव्य आगमनाचे औचित्य साधूनसांगलीमध्ये विशाल निरंकारी संत समागम संपन्नस्थिर परमात्म्याशी नाते जोडल्यानेच जीवनात स्थिरता येईल सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजसांगली, १८ मार्च, २०२३: ”स्थिर परमात्म्याशी नाते जोडल्यानेच जीवनात आपोआपच स्थिरतेचा भाव उत्पन्न होतो.” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगलीच्या नियोजित एअरपोर्टच्या मैदानावर आयोजित एक दिवसीय निरंकारी संत समागमामध्ये उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. या समागमात सांगली व कोल्हापुरसह आजुबाजुच्या जिल्ह्यांतून तसेच निकटवर्ती कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून हजारोंच्या संख्येने मानव परिवार सहभागी झाला होता. सद्गुरु माताजींनी सांगितले, की परमात्मा शांतस्वरूप, सर्वव्यापी व शाश्वत आहे. त्यामुळे त्याच्याशी नाते जोडणाऱ्याच्या जीवनात स्वाभाविकपणेच शांती व स्थिरता येते. याउलट अस्थिर मायेशी नाते जोडणाऱ्याच्या जीवनात चंचलता कायम राहते. परमात्म्याचा बोध प्राप्त करुन त्याच्याशी एकरुपता साधणाऱ्यालाच खऱ्या अर्थाने भक्त म्हटले जाते. त्याच्या संत स्वभावातूनच तो प्रभुभक्त आहे याची जाणीव होते. सद्गुरु माताजींनी ब्रह्मज्ञानाच्या दिव्यतेविषयी प्रतिपादन करताना सांगितले, की ब्रह्मज्ञानाद्वारे ईश्वराची ओळख करुन त्याच्या अनुभूतीमध्ये जीवन जगल्याने आपली कर्मे सुंदर बनतात, आपली बुद्धी विपरीत दिशेला जात नाही आणि एक यथार्थ मनुष्य होण्याकडे आपला जीवनप्रवास होऊ लागतो. ज्याप्रमाणे साखर गोड आहे हे माहित असले आणि साखर आपल्या समोर ठेवली तरीही ती चाखून पाहिल्याशिवाय आपल्याला तिची गोडी कळत नाही तद्वत परमात्म्याला जाणल्यानंतर त्याची अनुभूती घेतल्यानेच आपल्याला भक्तीची गोडी कळते.शेवटी, सद्गुरु माताजी म्हणाल्या, की भक्तांची हृदये परोपकारी असतात. आपले सुंदर आचरण व सेवा याद्वारे या धरतीला आणखी सुंदर बनविण्याचा त्यांचा प्रयास असतो. याच भावनेने ते आध्यात्मिक ज्ञानाने आपले अंत:करण उज्ज्वल करतात आणि बाह्य प्रकृतीच्या सुंदरतेसाठी पर्यावरणाची स्वच्छता व रक्षण करण्यासाठी स्वच्छ जल-स्वच्छ मन तसेच वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबवतात. शिवाय रक्तदानासारखे उपक्रम राबवून मानवमात्राच्या निष्काम सेवेमध्ये आपले योगदान देतात. सर्वांचे असेच सुंदर जीवन बनावे.तत्पूर्वी संत समागमाच्या कार्यक्रमा दरम्यान विद्वान वक्ता, गीतकार व कवी सज्जनांनी त्यांचे विचार, गीत, कविता इत्यादी माध्यमांतून सत्यप्राप्तीसाठी प्रेरणादायी भाव व्यक्त केले. समागमामध्ये अनेक मान्यवर व्यक्तींनी सहभागी होऊन सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी या दिव्य युगुलाचे आशीर्वाद प्राप्त केले. सांगलीमध्ये आयोजित या संत समागमात श्री जालिंदर जाधव जी (संयोजक, सांगली) यांनी समस्त भाविक-भक्तगणांच्या वतीने सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांचे हार्दिक आभार व्यक्त केले आणि स्थानिक प्रशासन व इतर सरकारी यंत्रणांना त्यांच्या बहुमोल सहकार्याबद्दल धन्यवाद . .......... read more 1 203 10915 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 14/03/2023 12:03 PM Edit Delete निरंकारी सद्गुरूंचे सांगलीमध्ये दिव्य आगमन 17 मार्चला विशाल निरंकारी संत समागमाचे आयोजन भक्तगणांमध्ये अद्भुत उत्साह आणि हर्षोल्हासाचे वातावरण सांगली:-13 मार्च 2023 महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रे अंतर्गत विश्वबंधुत्व व एकत्वाचा दिव्य संदेश देण्यासाठी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी या दिव्य विभुतींचे सांगली नगरीत आगमन होत असून त्यांच्या पावन सानिध्यात दिनांक 17 मार्च 2023 रोजी सायंकाळी ४:३० ते ८:३० वाजेपर्यंत विशाल एक दिवसीय निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन "पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर बुधगाव येथील नियोजित विमानतळ ग्राउंड कवलापूर तासगाव रोड सांगली" या मैदानावर करण्यात येत आहे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राज पिताजी यांच्या पावन सानिध्यात आयोजित होत असलेल्या या एक दिवसीय विशाल निरंकारी संत समागमाचा आनंद प्राप्त करण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्हा व्यतिरिक्त कोल्हापूर, सोलापुर व कर्नाटक राज्य परिसरातील तसेच अन्य भागातून हजारोच्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत. सद्गुरूंच्या दिव्य आगमनाच्या प्रति भक्तामध्ये अद्भुत उत्साह आणि हर्षोल्हासाचे वातावरण दिसून येत आहे निश्चितपणे या दिव्य संत समागमाचा उद्देश मानवामध्ये मानवी मूल्यांची जागृती करून अवघ्या विश्वामध्ये मानवतेने युक्त शांतीसुखाचे सुंदर वातावरण स्थापित करणे हाच आहे तरी सांगली परिसरातील सर्व भाविकांनी या संत समागमास उपस्थित राहुन सदगुरु माताजींचे दर्शन घेऊन अशिर्वाद प्राप्त करावेत असे आवाहन मंडळाच्या स्थानिक संयोजक यांनी केले. .......... read more 1 7 1265 views 0 comment 3 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 19/02/2023 01:02 PM Edit Delete देशिंग येथे संत निरंकारी सत्संग भवनचे उद्घाटन उत्साहात संपन्नसंत निरंकारी मंडळ शाखा देशिंग येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सत्संग भवन इमारतीचे उद्घाटन निरंकारी मंडळाचे आदरणीय सुखदेव सिंहजी मेंबर इंचार्ज & जनरल सेक्रेटरी स.नि. म.दिल्ली यांचे शुभहस्ते संपन्न झाले यावेळी आयोजित विशाल सत्संग सोहळ्यामध्ये महात्मा म्हणाले की सत्संग भवनाची आपण सर्वांनी कदर केली पाहिजे सत्संग भवन मध्येच मानवाला खऱ्या मानवतेची शिकवण दिली जाते कारण सत्संग चा महिमा अपरंपार आहे सत्संगमुळे आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते सदगुरु ने आपल्याला पुर्ण परमात्म्याशी जोडलेले आहे सदगुरु सगळ्यावर प्रेम करतात ते ह्रदयापासुन करतात आपणास नेहमी सत्संग घडावी निरंकार परमात्म्याच्या एकत्र येऊन गुणानवाद करता यावा म्हणुन सत्संग भवनची निर्मिती केली आहे तरी सर्वानी नियमित सत्संग केली पाहिजे समयाच्या सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज ह्या ब्रह्मज्ञान द्वारे जगामध्ये विश्वबंधुत्व निर्माण करण्याचे महान कार्य करीत आहेत त्याची शिकवण आपल्या जीवनामध्ये धारण करून आपण आपले जिवन सुखमय करावे आदी विचार मांडले. यावेळी कोल्हापूर झोनचे झोनल इंचार्ज अमरलाल निरंकारी यांनी नवीन भवन इमारत झाले बद्दल देशिंग येथील भक्तांना शुभेच्छा दिल्या यावेळी सेवादल विभागाचे क्षेत्रिय संचालक जगन्नाथ निकाळजे, रमेशलाल वाधवाणी कोल्हापूर,व सांगली जिल्हातुन मोठ्या संख्येने संत भाविक भक्त उपस्थित होते यावेळी देशिंग गावातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचलन प्राध्यापक सुरेश पोळ यांनी केले आभार सांगली संयोजक जालिंदर जाधव यांनी मानले सत्कार व कार्यक्रमाचे नियोजन देशिंग शाखेच्या मुखी अलका सुतार भगिनी यांचे मार्गदर्शन खाली सेक्टर मधिल सर्व सेवादल व संत महापुरुष यांनी केले.------------------------------------- .......... read more 1 296 14647 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 02/02/2023 01:02 PM Edit Delete निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेत आयोजितसामूहिक विवाह सोहळ्यात 48 जोडपी विवाहबद्धऔरंगाबाद, 30 जानेवारी, 2023: महाराष्ट्राच्या 56व्या निरंकारी संत समागमाची काल विधिवत सांगता झाल्यानंतर आज दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी येथील मैदानावर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात अत्यंत मंगलमय वातावरणात 48 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. साध्या व सामूहिक विवाहांना चालना देण्याच्या संत निरंकारी मिशनच्या सामाजिक सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत साधेपणाने, पण तरीही अत्यंत प्रभावशाली स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपारिक ‘जयमाला’ (पुष्पहार) आणि प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात ‘सामायिक हार’ (सांझा हार) घालून करण्यात आला. त्यानंतर सुमधूर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्रांच्या रुपात असलेल्या चार ‘निरंकारी लांवां’चे (मंगलाष्टका) गायन करण्यात आले. प्रत्येक ‘लांवां’च्या शेवटी सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी तसेच विवाहासाठी आलेले नवदांपत्यांचे नातलग व उपस्थित भाविक-भक्तगणांकडून वधुवरांवर पुष्पवर्षाव करण्यात आला. विवाह समारोहाच्या शेवटी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नवविवाहित दांपत्यांना आपल्या दिव्य वाणी द्वारे पावन आशीर्वाद प्रदान करताना सांगितले, की या समारोहामध्ये वर-वधूंचे वैवाहिक नाते जोडले गेल्याने दोन्ही बाजुच्या परिवारांचे मिलन घडून आले आहे. त्यांनी एकमेकांचा मनापासून स्वीकार करावा. वर-वधूंनी आपसात ताळमेळ ठेवून प्रेम, नम्रता यांसारख्या दिव्य गुणांचा अंगिकार करावा आणि जीवनात येणाऱ्या अडी-अडचणींची सोडवणूक करावी. निरंकारी विवाहांचे वैशिष्ट्य असलेला सामायिक हार हा गृहस्थीची जबाबदारी पती-पत्नी दोघांचीही समान आहे. त्यांनी आपल्या जीवनात सत्संग, सेवा आणि स्मरण करत निराकार प्रभूला प्राथमिकता द्यावी. शेवटी, सद्गुरु माताजींनी नव विवाहित दांपत्यांच्या जीवनात आध्यात्मिक पैलू सदृढ राहावा आणि त्यांचे जीवन आनंदमय व्हावे, अशी मंगल कामना केली. आजचा हा विवाह सोहळा आंतरराज्यीय स्वरुपाचा होता. महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, चिपळूण, नाशिक, सोलापूर, डोंबिवली, सातारा, नागपूर, रायगड, पुणे, कोल्हापूर आणि अहमदनगर क्षेत्रातील वर-वधू या विवाह सोहळ्यात सहभागी होते. या व्यतिरिक्त पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथूनही वर-वधू आले होते. .......... read more 1 55 14637 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 01/02/2023 05:02 PM Edit Delete निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री महोदयांची भेटघेतले आशीर्वादअहंकाराचा त्याग करुन निरंकाराला हृदयामध्ये वसवावे- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज औरंगाबाद 29 जानेवारी, 2023: “अहंकाराचा त्याग करुन निरंकार प्रभूला हृदयामध्ये वसवून खरेखुरे मानवी जीवन जगावे” असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी विभागात चालू असलेल्या महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने आलेल्या विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की अहंकारामुळे मनुष्य स्वत:ला श्रेष्ठ मानत असतो आणि मनामध्ये भौतिक वस्तूंना ईश्वरापेक्षाही अधिक मौल्यवान मानत असतो. परिणामी तो जीवनाच्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ राहतो आणि खरेखुरे मानवी जीवन जगू शकत नाही. याउलट जर मानवाने ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराशी नाते जोडले आणि सदोदित ईश्वराची जाणीव ठेवली तर त्याचे जीवन मौल्यवान होऊन जाते. सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की ज्याप्रमाणे एक थेंब जेव्हा सागराला मिळतो तेव्हा त्याला सागराची उपमा मिळते. तद्वत मनुष्य जेव्हा भ्रामक ‘मी’चे अस्तित्व सोडून देतो आणि ईश्वररूपी शाश्वत ‘तू’च्या प्रति समर्पित होतो तेव्हा त्याला ईश्वरस्वरूप झाल्याचा श्रेष्ठ दर्जा आपसूकच प्राप्त होतो. शेवटी, सद्गुरु माताजींनी समजावले, की ज्याप्रमाणे साबण आणि पाणी यांची सोबत केल्याने मळलेले कपडे स्वच्छ होतात तद्वत परम पावन परमात्म्याशी नाते जोडून त्याच्याशी अभिन्नता प्राप्त केल्याने आपण अंतर्बाह्य निर्मळ होऊन जातो, ज्यायोगे आपल्या जीवनात सहजपणे आत्मिकता आणि मानवता यांचा संगम होतो. मा.मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी रविवारी संत समागमाला सदिच्छा भेट दिली आणि सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी उदात्त कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, संत-महात्मा सदोदित मानवाच्या जीवनात शांतीसुखाची प्राप्ती व्हावी आणि त्यांचे कल्याण व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आज हे निरंकारी मिशन सुद्धा विश्वबंधुत्वाचे हेच उदात्त कार्य करत आहे. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, की महाडमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी निरंकारी भक्तांनी जे मदत कार्य केले होते ते खरोखरच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे. मिशनकडून कोविड दरम्यान सुद्धा कौतुकास्पद कार्य केले असून नैसर्गिक आपत्ती असो किंवा स्वच्छता अभियानासारखे सामाजिक उपक्रम असोत अनेक कार्यामध्ये हे मिशन आपले योगदान देत आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांसमवेत औरंगाबादचे पालकमंत्री श्री.संदीपान भुमरे आणि मंत्री श्री.अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. .......... read more 1 107 14640 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 01/02/2023 12:02 PM Edit Delete आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देत56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगताद्वेषाच्या भिंती पाडून प्रेमाचे पुल उभारण्याचे निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे आवाहन औरंगाबाद 30 जानेवारी, 2023: “मानवाने आपल्या मनातील द्वेषाच्या भिंती जमिनदोस्त करुन प्रेमाचे पुल उभारावेत” असे आवाहन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये मानवतेच्या नावे संदेश देताना केले. औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी परिसरात सुमारे 300 एकर मैदानावर हा तीन दिवसीय विशाल निरंकारी संत समागम दिनांक 27 ते 29 जानेवारी, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्या विविध भागांतून लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला होता. विदेशातूनही शेकडो भक्त या समागमामध्ये सहभागी झाले होते. सद्गुरु माताजी म्हणाल्या, की या जगात आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत तर उदात्त मानवी मूल्ये आणि दिव्य गुणांनी युक्त जीवन जगायला हवे. शोभायात्रा या संत समागमाचा शुभारंभ 27 जानेवारी रोजी सकाळी औरंगाबाद-पैठण मार्गालगत असलेल्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) अंतर्गत मार्गावर आयोजित केलेल्या भव्य शोभा यात्रेने झाला. या शोभायात्रेमध्ये सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी हे दिव्य युगुल एका फुलांनी सुशोभित खुल्या वाहनामध्ये विराजमान राहून शोभायात्रेद्वारे त्यांच्या समोरुन जाणाऱ्या भक्तगणांचे अभिवादन स्वीकारत त्यांना आशीर्वाद प्रदान करत होते. या शोभायात्रेमध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेमाच्या अलौकिक भावनांनी युक्त होऊन आपापल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत भाविक-भक्तगण मानवतेच्या रंगांचे दर्शन घडवताना दिसत होते. त्यामध्ये वाशिममधून पावली नृत्य, अकोला व कोटारी आंध्र प्रदेश येथून बंजारा नृत्य, शहापूर येथून तारपा नृत्य, मुंबई, महाड व सावरगांव येथून लेझिम, राळेगणसिद्धी व कळंबोली येथून दिंडी, जामखेड येथून समूह नृत्य, शिवडी (मुंबई) व कोपरखैरणे (नवी मुंबई) येथून वारकरी, चिपळूणमधून ढोल पथक, विट्ठलवाडी येथून समूह नृत्य, महाड येथून आदिवासी नृत्य, दापोली व पालघर येथून कोळी नृत्य, कराडमधून धनगरी गजनृत्य, चारोटी येथून तारपा नृत्य इत्यादिंचा समावेश होता.शाश्वत ईश्वराशी नाते जोडल्यानेच जीवन आनंदमय व सार्थक होऊ शकते शोभा यात्रेनंतर सुरु झालेल्या सत्संगाच्या खुल्या सत्राच्या शेवटी सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की शाश्वत ईश्वराशी नाते जोडल्यानेच जीवन आनंदमय व सार्थक होऊ शकते. कारण प्राकृतीक वस्तूंपासून आपल्याला कायमदायम टिकणारा आनंद मिळू शकत नाही. प्राकृतीक वस्तूंपासून मिळणाऱ्या सुखाच्या पलीकडे एक शाश्वत आनंदाची अवस्था आहे आणि ती अवस्था केवळ अविनाशी परमात्म्याशी एकरूप होण्यानेच प्राप्त होऊ शकते. परमात्मा हे एक असे सत्य आहे ज्याला खोटे ठरवले जाऊ शकत नाही. परमात्मा आपल्या जीवनात सदोदित विद्यमान असतो. तो घटत नाही किंवा वाढत नाही, जळत नाही अथवा तुटत नाही. परमात्मा कोणत्याही आकाराशी बांधील नाही. अशा परम अस्तित्वावर आधारित जगणारा मनुष्य दु:खाने विचलीत होत नाही किंवा सुखाने हुरळून जात नाही. सेवादल रॅली समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात एका प्रभावशाली सेवादल रॅली द्वारे झाली. या सेवादल रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने सेवादलाचे महिला व पुरुष स्वयंसेवक आपापल्या निर्धारित गणवेषामध्ये सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिका प्रस्तुत करण्यात आल्या ज्यामधून भक्तीमध्ये सेवेचे महत्व पटवून दिले गेले. या व्यतिरिक्त शारीरिक व्यायाम, योगा व मल्लखांब यांसारखे साहसी खेळ सादर केले गेले. रॅलीच्या शेवटी सेवादल बंधु-भगिनींना आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की ब्रह्मज्ञानी तर सदैवकाळ सेवादारच असतो. सेवा ही आवश्यकतेनुसार दिलेल्या आदेशानुसार पूर्ण तन्मयतेने, सजगपणे आणि भक्तीभावाने केली जाते. अहंकाराचा त्याग करुन निरंकाराला हृदयामध्ये वसवावे समागमाच्या दुसऱ्या दिवशीच्या मुख्य सत्राला संबोधित करताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की “मानवाने अहंकाराचा त्याग करावा आणि निरंकार प्रभूला आपल्या हृदयामध्ये वसवून यथार्थ मानवी जीवन जगावे. त्या पुढे म्हणाल्या, की अहंकारामुळे मनुष्य स्वत:ला श्रेष्ठ मानत असतो आणि मनामध्ये भौतिक वस्तूंना ईश्वरापेक्षाही अधिक महत्व देत असतो. परिणामी तो जीवनाच्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ राहतो आणि खरेखुरे मानवी जीवन जगत नाही. खऱ्या अर्थाने मानवी जीवन जगण्यासाठी त्याला ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराशी नाते जोडण्याची गरज आहे.मा.मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी रविवारी संत समागमाला सदिच्छा भेट दिली आणि सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी उदात्त कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, निरंकारी मिशन विश्वबंधुत्वाचे उदात्त कार्य करत आहे. शिवाय अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, की महाडमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी निरंकारी भक्तांनी जे मदत कार्य केले होते ते प्रत्यक्ष पहायला मिळाले. खरोखरच ते प्रशंसनीय आणि प्रेरणादायी असे होते. मिशनकडून कोविड दरम्यान सुद्धा कौतुकास्पद कार्य केले असून नैसर्गिक आपत्ती असो किंवा स्वच्छता अभियानासारखे सामाजिक उपक्रम असोत अनेक कार्यामध्ये हे मिशन आपले योगदान देत आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांसमवेत औरंगाबादचे पालकमंत्री श्री.संदीपान भुमरे आणि मंत्री श्री.अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बहुभाषी कवी संमेलन समागमाच्या शेवटच्या दिवशी सत्संगाच्या मुख्य सत्रामध्ये एक बहुभाषी कवी संमेलन आयोजित करण्यात आले ज्याचा विषय होता “आत्मिकता व मानवता संग संग ही सदा असावी”. या कवी संमेलनामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, भोजपुरी, कन्नड, अहिराणी, कोंकणी आदि भाषांतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या. समागमाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी लघु कवी संमेलनांमध्ये प्रत्येकी ५ कविता सादर करण्यात आल्या ज्या मराठी, हिंदी व पंजाबी भाषांमधील होत्या. संत समागमाची सांगता सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या अमृतवाणी द्वारे संत समागमाची सांगता झाली. त्यामध्ये त्यांनी प्रतिपादन केले, की निराकार परमात्मा कायमदायम सत्य आहे. सर्व काळात होऊन गेलेल्या संतांनी जगाला एकच संदेश दिला आहे. वेगवेगळ्या भाषेतील आणि वेगवेगळ्या प्रांतांतील संतांचा संदेश सारखाच आहे. हा काही निव्वळ योगायोग नव्हे. त्या काळी आजसारखी सोशल मीडियाची सोयदेखील नव्हती. यावरुन एकच सिद्ध होते, की ब्रह्मज्ञान हे तेव्हाही सत्य होते आणि आजही सत्य आहे. या ज्ञानाद्वारे निराकाराची प्राप्ती करुन जिवंतपणीच मुक्तीची अवस्था धारण करणे हेच मानवी जीवनाचे मुख्य लक्ष्य होय. निरंकारी प्रदर्शनी : संत निरंकारी मिशनचा इतिहास, विचारधारा व सामाजिक उपक्रमांचे सचित्र दर्शन घडविणारी निरंकारी प्रदर्शनी समागम स्थळावर आलेल्या भक्तगणांच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिली होती. या प्रदर्शनीमध्ये चित्रे, छायाचित्रे, विविध मॉडल्स यांच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मिशनचा इतिहास, विचारधारा व सामाजिक उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. बाल प्रदर्शनीमध्ये मुलांच्या जीवनात मिशनच्या संदेशाचे महत्व आध्यात्मिक जागृतीची गरज यांचे महत्व पटवून देण्यात आली होती तर आरोग्य व समाजकल्याण विभागाच्या प्रदर्शनीमध्ये मानवी देहाच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन करण्याबरोबरच मिशनच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. कायरोप्रॅक्टिक शिबिर संत समागमामध्ये आयोजित करण्यात आलेले कायरोप्रॅक्टिक चिकित्सा शिबिर गरजू भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिले होते. कायरोप्रॅक्टिक ही एक वैकल्पिक चिकित्सा पद्धती आहे जी विशेषत: मेरुदंडाच्या तांत्रिक विकारांचे निदान, निवारण आणि उपचारांवर भर देते. मागील जवळ जवळ 10-11 वर्षांपासून निरंकारी संत समागमांमध्ये या शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या शिबिरामध्ये कॅनडा, अमेरिका, यू.के., यूरोप, चीन, जर्मनी आणि सिंगापूर आदि 7 देशांतून आलेल्या 17 डॉक्टरांचे पथक निष्काम भावाने आपल्या सेवा अर्पण करत आहेत. मागील दोन दिवसांत या शिबिरामध्ये सुमारे 6000 गरजूंनी या उपचारांचा लाभ घेतला. लाईफ कायरोप्रॅक्टिक वेस्ट या संस्थेचे अध्यक्ष डॉ.ऑर्बिस्टन यांनी सांगितले, की निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीसाठी ज्या उत्साहाने व निष्काम भावनेने निरंकारी सेवादार आपल्या सेवा अर्पण करतात त्यातून आम्हाला मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा प्राप्त होते आणि समागमाच्या दैवी वातावरणातून या निष्काम सेवा पार पाडण्याची ऊर्जा प्रापत होते. लंगर, निवास व वाहतूक व्यवस्था संत समागमासाठी आलेल्या भाविकांसाठी समागम समितीच्या मार्गदर्शनाखाली 24 तास लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. आलेल्या भाविकांची राहण्याची व्यवस्था प्रशस्त तंबूंमध्ये केली होती तर त्यांच्यासाठी वीज, पाणी, स्वच्छतागृह इत्यादिंचीही सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना औरंगाबाद येथून समागम स्थळावर येण्या-जाण्यासाठी मोफत बसेसचीही व्यवस्था केलेली होती. .......... read more 1 108 14644 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 28/01/2023 04:01 PM Edit Delete आत्मिकते संगे मानवतेच्या रंगांचे दर्शन घडविणाऱ्या भव्य शोभा यात्रेनेमहाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शुभारंभ मानव आहोत तर मानवी गुणांचा अंगीकार करु यानिरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज औरंगाबाद 27 जानेवारी, 2023: “या जगात आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत तर मानवी गुणांचा अंगीकार करु या आणि यथार्थ मानव बनून जीवन जगू या.” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये मानवतेच्या नांवे प्रेषित केलेल्या आपल्या संदेशामध्ये व्यक्त केले. औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी परिसरात सुमारे 300 एकर मैदानावर आयोजित या तीन दिवसीय विशाल निरंकारी संत समागमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्या विविध भागांतून लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला आहे. विदेशातूनही शेकडो भक्त या समागमामध्ये सहभागी झाले आहेत. सद्गुरु माताजी म्हणाल्या, की ज्या परमात्म्याने या सृष्टीची रचना केली आहे त्याचाच अंश प्रत्येक मानवामध्ये आत्म्याच्या रूपात विद्यमान आहे. मनुष्य जेव्हा परमात्म्याला जाणून घेतो तेव्हा त्याला प्रत्येकामध्ये परमात्म्याला पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. त्याच्या मनात एकत्वाचा भाव उत्पन्न होतो. मग तो आहार, वेशभूषा, उच्च-नीच, जाती-पाती इत्यादीतील विभिन्नतेमुळे कोणाचा द्वेष करत नाही. | त्याच्या मनातील द्वेषाच्या भिंती जमिनदोस्त होऊन प्रेमाचे पुल निर्माण होतात. मनामध्ये जेव्हा ईश्वराचा निवास होतो तेव्हा सर्व गोष्टी आध्यात्मिकतेने युक्त होतात. परमात्म्याच्या जाणीवेमध्ये केलेली प्रत्येक गोष्ट आपसुकच मानवतेने युक्त होते.शोभायात्रा तत्पूर्वी आज सकाळी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) अंतर्गत मार्गावर आयोजित केलेल्या भव्य शोभा यात्रेने या संत समागमाचा प्रारंभ झाला. या शोभायात्रेमध्ये सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी हे दिव्य युगुल एका फुलांनी सुशोभित खुल्या वाहनामध्ये विराजमान राहून शोभायात्रेद्वारे त्यांच्या समोरुन जाणाऱ्या भक्तगणांचे अभिवादन स्वीकारत त्यांना आशीर्वाद प्रदान करत होते. या शोभायात्रेमध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेमाच्या अलौकिक भावनांनी युक्त होऊन आपापल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत भाविक-भक्तगण मानवतेच्या रंगांचे दर्शन घडवताना दिसत होते. त्यामध्ये वाशिममधून पावली नृत्य, अकोला व कोटारी आंध्र प्रदेश येथून बंजारा नृत्य, शहापूर येथून तारपा नृत्य, मुंबई, महाड व सावरगांव येथून लेझिम, राळेगणसिद्धी व कळंबोली येथून दिंडी, जामखेड येथून समूह नृत्य, शिवडी (मुंबई) व कोपरखैरणे (नवी मुंबई) येथून वारकरी, चिपळूणमधून ढोल पथक, विट्ठलवाडी येथून समूह नृत्य, महाड येथून आदिवासी नृत्य, दापोली व पालघर येथून कोळी नृत्य, कराडमधून धनगरी गजनृत्य, चारोटी येथून तारपा नृत्य इत्यादिंचरा समावेश होता. शोभा यात्रेच्या अंतिम टप्प्यात स्वयं सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी त्यामध्ये सहभागी झाले. शोभा यात्रा समागमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येताच समागम समितीच्या सदस्यांनी समस्त साध संगतच्या वतीने या दिव्य युगुलाचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले. त्यानंतर समागम समितीचे सदस्य आणि मिशनचे अन्य अधिकारी यांनी दिव्य युगुलाला समागम पंडालमधून मुख्य मंचापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांच्या पालखीचे नेतृत्व केले. या प्रसंगी पंडालमध्ये उपस्थित भक्तगण आपल्या हृदयसम्राट सद्गुरूला आपल्या दरम्यान पाहून हर्षभरित झाले आणि धन निरंकारचा जयघोष करत त्यांनी दिव्य युगुलाचे हार्दिक अभिनंदन व अभिवादन केले. अत्यानंदाने अनेक भक्तांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूच्या धारा प्रवाहित झाल्या. महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक संत समागमाच्या निमित्ताने आज दुपारी संत निरंकारी मंडळाच्या प्रेस व पब्लिसिटी विभागाच्या मेंबर इंचार्ज पूज्य श्रीमती राजकुमारी यांच्या अध्यक्षतेखाली एक पत्रकार परिषद समागम स्थळावरच घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींनी समागमसंबंधी माहिती जाणून घेतली. .......... read more 1 185 14642 views 0 comment 2 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 18/01/2023 02:01 PM Edit Delete समर्पित भक्तीभावाने युक्त जीवन एक उत्सव बनून जाते - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज दिल्ली, 16 जानेवारी, 2023: ‘सदोदित समर्पितपणे भक्तीभावाने युक्त होऊन जगलेले जीवन हे एक उत्सव बनून जाते असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भक्ती पर्व समागम’ मध्ये उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले. दिल्ली, एनसीआर व आजुबाजुच्या निरंकारी भक्तगणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. भक्ती पर्व समागमामध्ये मुख्यत्वे करुन परम संत संतोख सिंहजी व अन्य भक्तांनी मिशनसाठी केलेल्या तप-त्यागपूर्ण जीवनाचे स्मरण केले जाते. हा कार्यक्रम देश-विदेशामध्ये आयोजित करण्यात आला. भक्तीची परिभाषा समजावताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की सहज-सुंदर जीवन जगून आनंदाची अवस्था प्राप्त करणे हीच यथार्थ भक्ती होय. यामध्ये चतुराई किंवा चलाखीला कोणतेही स्थान नाही. पूर्णपणे समर्पित होणे हीच भक्तीची पराकाष्टा होय. संत-महात्म्यांच्या वाणीतून आपल्याला हीच शिकवण मिळत आली आहे, की आपण इतरांना प्राथमिकता द्यायची आहे; परंतु आपण तसे करत नाही. आपण अनिष्ट प्रथा आणि अवडंबरामध्ये इतके बांधले जातो, की भ्रमाशिवाय आमच्या हाती काही उरत नाही. जेव्हा आपण या निराकार प्रभूशी जोडले जातो तेव्हाच आपल्या मनातील समस्त भ्रम संपूर्ण जातात. सद्गुरु माताजींनी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या शिकवणूकीचे उदाहरण देऊन सांगितले, की ज्याप्रमाणे घर तयार होण्याआधी त्याचा नकाशा तयार होतो. त्यानंतर त्यावर घर बांधले जाते. घर बांधल्याशिवाय त्याचा आनंद मिळू शकत नाही. अगदी अशाच प्रकारे भक्तीचा आधार सेवा, स्मरण आणि सत्संग आहे. यामध्ये आपण सर्वांशी गोड बोलून सर्वांप्रति परोपकाराची भावना बाळगायची आहे. अशी भावना मनापासून हवी, केवळ दिखावा असता कामा नये. भक्ती हा प्रत्येकाचा स्वत:चा प्रवास असून या प्रभूशी एकरूप होण्याचा एक सरळ मार्ग आहे. अशा भक्तीनेच जीवन सार्थक बनते आणि भौतिक दिखावटीपासून आपण मुक्त होतो. भक्तीभावनेने ओतप्रोत जीवन जगणारा संत साध्या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करतो. भौतिक जगाची चमक-दमक त्याच्यावर प्रभाव पाडू शकत नाही. इतरांचे दु:ख समजून घेऊन तो त्यांच्या प्रति आपुलकीचा भाव बाळगतो. त्याचे जीवन वाहत्या नदीसारखे निर्मळ असते. मायाच्या प्रभावाविषयी समजावताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की ज्याप्रमाणे निराकार प्रभूने निर्मिलेल्या या सृष्टीमध्ये अनेक भिन्नता असूनही सर्वांमध्ये निराकार ईश्वराचा सारखाच वास आहे तद्वत जी जी वस्तू मायेच्या रूपात आहे ती क्षणभंगूर आहे. म्हणूनच क्षणभंगूर मायेशी संलग्न न होता या स्थिर अशा परमात्म्याशी नाते जोडावे. संतांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपले जीवन आपली भक्ती सदृढ करावी. भक्तिपर्व समागमाच्या प्रसंगी सद्गुरु माताजींच्या प्रवचनापूर्वी निरंकारी राजपिता रमितजी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की भक्ताचे जीवन तेव्हाच भक्तीरूप होते जेव्हा त्याच्या आचरणात व व्यवहारामध्ये प्रेमरूपी सुगंध दरवळू लागतो. आपण स्वत:ला सद्गुरु माताजींच्या प्रति समर्पित करुन आनंद व उत्सवपूर्ण जीवन जगावे. आपल्या कर्मांच्या प्रभावाने इतरांसाठी प्रेरणास्रोत बनावे. गुरुवचनांना सत्य वचन मानून जीवन जगणे हीच खरी भक्ती होय. क्षणोक्षणी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणे हेच खऱ्या भक्ताचे लक्षण होय. भक्ती हे कोणत्याही दिखाव्याचे किंवा अवडंबराचे नाव नाही ज्यामुळे लोक भयभीत होतील. भक्ती म्हणजे या साकाराकडून निराकाराची प्राप्ती करणे आणि त्याच्याशी एकरूप होण्याची अवस्था आहे. राजपिताजींनी उदाहरण दिले, की ऑर्केस्टामध्ये ध्वनी निर्देशन करण्यासाठी एक निर्देशक असतो. तो वादकांना निर्देश देत असतो. परिणामी एक सुंदर ध्वनी श्रवण करायला मिळतो. परंतु यातील एका जरी वादकाने स्वत:च्या मनमर्जीने कार्य केले तर तो संपूर्ण ध्वनी बदलून जाईल. तात्पर्य, जेव्हा आपण जीवनात लालसा, मोह, स्वार्थ यांसारख्या भ्रमांमध्ये अडकतो तेव्हा जीवनातील आनंदरूपी मधुरता संपून जाते. जीवनात गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. तोच खरा मार्गदर्शक व प्रेरणास्रोत असतो जो आपल्या सकारात्मक प्रभावाने आपल्याला मौल्यवान बनवतो. त्यामुळे गुरुविना भक्ती शक्य नाही. अशी अवस्थाच भक्तीमय असते आणि आपल्या जीवनाचा आधारदेखील बनते. शेवटी, सद्गुरु माताजींनी समस्त भक्तगणांना भक्तीमार्गावर अग्रेसर होण्याची प्रेरणा दिली आणि पुरातन संतांच्या भक्तीभावनेतून प्रेरणा घेऊन आपले जीवन सार्थक करण्याचे आवाहन केले. .......... read more 1 18 14646 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 12/01/2023 02:01 PM Edit Delete जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण स्थापित करण्यामध्ये आपले योगदान द्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजमहाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानिमित्त विशेष लेख. हा संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. आमच्या जीवनाचा हाच उद्देश असावा, की आम्ही जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण स्थापित करण्यामध्ये आपले योगदान देऊ शकू. आम्ही स्वत:ला अशा प्रकारे घडवावे, की आपण सर्व एकतेच्या मार्गावर अग्रेसर आहोत. आपण एकमेकामध्ये कोणताही भेदभाव बाळगू नये, सर्वांना समान दृष्टीने पहावे. कोणी काय आहार घेतात, कसे दिसतात, त्यांची वेशभूषा कशी आहे, त्यांची जात वेगळी आहे या सर्व भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेचा व्यवहार करावा. जोपर्यंत आपण सर्वांना समान दृष्टीने पाहणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनात वास्तविक भक्तीचा उद्गम होऊ शकणार नाही. भले मग आमची आस्था, विश्वास कोणावरही असो. जोपर्यंत आपण आपल्या गुरु-पीर-पैगंबरांची आणि संतांची वचने पूर्णपणे आपल्या जीवनात, वाणीमध्ये, व्यवहारामध्ये आणि आचरणात आणत नाही, तोपर्यंत आपल्या निजस्वरुपाला प्राप्त करु शकणार नाही. कारण आपल्या सर्वांचे मूळ हेच आहे, की- ‘इक्को नूर है सब दे अन्दर नर है चाहे नारी है।’ अर्थात् ‘सर्वांभूती असे एक ज्योती पुरुष असो किंवा नारी’. तात्पर्य, हे परमात्मा रूपी अस्तित्व एकच आहे जे सर्वांभूती सामावलेले आहे. परमात्म्याने एवढ्या मोठ्या विश्वाची निर्मिती केली आणि त्यामध्ये या पृथ्वीची रचना केली. या धरतीवर भिन्न-भिन्न प्रांतांमध्ये मनुष्याची उत्पत्ती केली. निश्चितच आणि स्वाभाविकत:च वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आलेल्या या मानव प्राण्याच्या आस्था आणि श्रद्धा वेगवेगळ्या आहेत. सर्वांचे आपापले धर्म आहेत आणि त्यानुसार वाहेगुरु, अल्ला, गॉड, ईश्वर अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते परमात्म्याचे स्तुतिगायन करत आहेत. परंतु या सर्वाचे मूळ शोधून पाहिले तर हीच वास्तविकता समोर येते, की समस्त मानवमात्र या एकाच निराकार परमात्म्याची लेकरं आहेत. आमचा प्रारंभ आणि अंत या प्रभुमध्येच आहे. असे असूनही आपण स्वत:ला जर एखाद्या विशिष्ट नामाशी किंवा रूपाशी जोडत असलो तरीही ते मुबारक आहे. तथापि, आपण हे लक्षात घ्यायला हवे, की आम्ही कुठेही असलो किंवा आमची आस्था कुठेही असली तरी सर्वप्रथम आपण एक मनुष्य आहोत. एक मनुष्य या नात्याने आपण आपल्या जीवनात मानवी गुण धारण करायला हवेत. संत निरंकारी मिशनचीदेखील हीच धारणा आहे, की- ‘धर्म जोडतो, तोडत नाहीं’. आपण जरी कोणत्याही धर्माला मानणारे असलो तरी आपली भावना ही मानवाला मानवाशी जोडण्याची असायला हवी. जीवनात आपण एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हायला हवे, एकमेकांना साथ द्यायला हवी, एकमेकाला सुख-आराम द्यायला हवा. प्रत्येक सज्जनाच्या हृदयामध्ये हीच धारणा असायला हवी. कोणत्याही कारणाने आपण एकमेकांमध्ये दुरावा येऊ देऊ नये. तो महात्मा कोणत्यातरी वेगळ्या धर्मावर आपली आस्था ठेवत आहे आणि माझी श्रद्धा कोणत्यातरी वेगळ्या धर्मावर असेल तर ते एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचे कारण बनू नये. जीवनामध्ये आपले सर्वांचे एकच लक्ष्य असायला हवे आणि ते म्हणजे एकोप्याची भावना अंगीकारणे. धर्म व आध्यात्मिकता यांचे कार्य सुरवातीपासूनच जोडण्याचे राहिलेले आहे. ते एक असे साधन आहे ज्याद्वारे सर्वप्रथम आपण यथार्थ मनुष्य बनू शकतो. सुरवातीपासूनच जसे संतांनी सांगितले आहे आणि गुरु-पीर-पैगंबरांनी आदेश दिले आहेत, प्रत्येक धर्माची सदोदित हीच शिकवण राहिली आहे, की आपण प्रत्येकाच्या प्रति सद्भावना बाळगावी. सर्वांसाठी आपल्या मनामध्ये दया, करुणा बाळगावी, सहनशीलता धारण करावी, आपले हृदय विशाल करावे, ईर्षा, द्वेष, तिरस्कार यांसारख्या भावनांचा त्याग करावा. तेव्हाच आपण जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण स्थापित करण्यामध्ये आपले योगदान देऊ शकतो. ..... .......... read more 1 34 14641 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 12/01/2023 02:01 PM Edit Delete प्रेम व एकोप्याच्या भावनेत सर्वांचे कल्याण निहितसद्गुरु माता सुदीक्षा जी महाराजमहाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानिमित्त विशेष लेख. हा संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. संतांनी आपल्या दिव्य वाणीमध्ये सदोदित हाच संदेश दिला आहे, की प्रेम व एकोप्याच्या भावनेत सर्वांचे कल्याण निहित असते. ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यात विशिष्ट वस्तू ठेवली असेल तर त्यातून तीच वस्तू आपल्याला प्राप्त होईल. उदा. एखाद्या भांड्यात आपण दूध ठेवले असेल तर तिथून दूधच मिळेल, एखादा आंबट पदार्थ ठेवला असेल तर तो मिळेल, गोड पदार्थ असेल तर तोच मिळू शकेल. तात्पर्य, आपण आपल्या मनरुपी भांड्यामध्ये काय साठवले आहे ते आपल्या व्यवहारावर आणि आचरणावर अवलंबून आहे. जर आपल्या अंतर्मनात, आमच्या विचारांमध्ये अहंकाराची भावना असेल तर आपण वेळूप्रमाणे असू जे केवळ एकमेकांशी टक्कर घेत राहतात. यासाठी आपल्या स्वभावात नम्रता असणे नितांत गरजेचे आहे. आपल्यामध्ये जर विनम्रता नसेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेऊ शकणार नाही. त्यामुळे अकारण असह्य पीडा सहन करत जीवन जगत राहावे लागेल. यास्तव स्वभावामध्ये सदैव नम्रता व कोमलतेची भावना असायला हवी. बहुधा आपण असे पाहतो, की एका दगडावर दुसरा दगड रगडला तर त्यातून ठिणगी बाहेर पडते. माणसाच्या बाबतीतदेखील असेच काहीतरी घडते. जेव्हा तो नकारात्मकतेची, दुष्ट विचारांची ठिणगी मनामध्ये बाळगतो तेव्हा तिला जागृत व्हायला केवळ एक हवेचा झोका पुरेसा आहे, लगेचच ती ठिणगी विशाल अग्निचे रूप धारण करते ज्यामध्ये आपले मस्तक होरपळून स्वत:चेच नुकसान करुन बसते. याकरिता प्रयत्न हाच करायचा आहे, की अशी नकारात्मक ठिणगी उत्पन्नच होऊ नये जिच्या प्रभावामुळे आपण आपसात भिडले जाऊ. आमचा स्वभाव शांत असावा. मनामध्ये कोणाच्याही बाबतीत अढी निर्माण होऊ नये ज्यामुळे आपले किंवा दुसऱ्याचेही नुकसान होणार नाही. जसे संपूर्ण हरदेव बाणीमध्ये म्हटले आहे, की-हर जाति हर वेश के बन्दे सदा प्यार से रह पायें।मानवता का भला इसी में आपस में न टकरायें। खरं तर आपण सर्व एकाच परमपिता परमात्म्याची लेकरं आहोत. असे असताना मनामध्ये परस्परांमध्ये वैर-ईर्षेची भावना उत्पन्न होण्याचे कारणच उरत नाही. आपण स्वत:मध्ये सुधारणा घडवत या जगामध्ये सुंदर प्रकारे विचरण करु तर निश्चितच हे जग सुधरेल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण याची सुरवात स्वत:पासून करु. संसारामध्ये राहत असताना आपले हे कर्तव्य आहे, की आपण श्रेष्ठ मार्ग निवडावा आणि सन्मार्गावर चालत राहून आपले जीवन सार्थक करावे. ---------------- .......... read more 1 24 14643 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 12/01/2023 02:01 PM Edit Delete मानवता हाच श्रेष्ठ धर्म होयसद्गुरु माता सुदीक्षा जी महाराजमहाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानिमित्त विशेष लेख. हा संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. युगानुयुगे संतांचा हाच संदेश राहिला आहे, की आपण मनुष्य देहात आलो आहोत तर मनुष्य बनून जगावे. हे जे श्वास मिळाले आहे ते मर्यादित असून अनमोल आहेत. ते असेच वृथा दवडू नयेत. आपल्या हयातीतच या श्वासांचा आणि जीवनाचा सदुपयोग करायचा आहे. आपले जीवन मानवी गुणांवर आधारित ठेवून खऱ्या अर्थाने मनुष्य व्हायचे आहे. मानवतेहून श्रेष्ठ कोणताही धर्म नाही. ज्या मानवाचे जीवन मानवी मूल्यांनी युक्त आहे तो जगासाठी एक वरदान आहे. आपण आपले जीवन संतांच्या वचनांवर आधारित करावे. जेव्हा आपण सत्संसगामध्ये येतो तेव्हा आपण सत्याशी संलग्न राहतो आणि जी वचनं आपल्याला श्रवण करायला मिळतात ती जीवन जगण्याची कला शिकवतात. सत्संगामधून प्राप्त केलेल्या लहान-सहान गोष्टी जरी अंगीकारल्या आणि त्यानुसार आचरण केले तर खरोखरच या मनामध्ये परिवर्तन घडून येते आणि आपण स्वयमेव चांगल्या मार्गावर अग्रेसर होण्यास प्रेरित होतो. आपण आपल्या मनात लपलेल्या निंदा, द्वेष यांसारख्या वाईट गोष्टी असतील किंवा कोणाला हीन दृष्टीने पाहण्याची वृत्ती असेल तर या गोष्टी मनातून काढून टाकल्या पाहिजेत. एखादी व्यक्ती आपल्याला कठोर शब्द बोलली तर तिच्याशी आयुष्यभर बोलणार नाही अशा प्रकारची भावना आपल्याला आणखी संकुचित करते. याउलट आपण आपले मन विशाल करायचे आहे. जरी कोणी आपल्याबरोबर वेगळा व्यवहार केला असेल तरीही आपण त्याला चांगुलपणाच दाखवायचा आहे. जसे शेख फरीदजी यांच्या या ओळी आहेत, की-फरीदा बुरे दा भला कर, गुस्सा मन दा ना हंडाई। जरी कोणी वाईट करत असेल तरीही त्याचे आपण भलेच करायचे आहे. कदाचित असे करणे त्यावेळी अवघड वाटू शकते. मानवी स्वभावामुळे जर कोणी काही चुकीचे बोलले तर समोरचा मनुष्यही उलटून काहीतरी कटू वचनं बोलतो. अशा वेळी या परमात्म्याला आठवावे. कोणी जरी काही वाईट केले असेल तरीही आपण आपल्यातील जो चांगुलपणा आहे तो टिकवून ठेवायचा आहे, आपल्या शब्दांतून चांगलीच भावना व्यक्त करायची आहे. आपले बोल, व्यवहार आणि विचार संतमतीनुसार असावेत. आपल्या मनामध्ये क्रोध किंवा असूया उत्पन्न होऊ नये. आपल्या बोलांनी कोणाचे मन दुखावले जाऊ नये ज्यामुळे तो दिवसभर तीच गोष्ट मनात ठेवून बसेल. आपण तेच कार्य करायचे आहे जे संतांनी शिकवले आहे. कोणाला दुखवू नये, कोणाच्या डोळ्यांत अश्रू आणू नये. समोरच्याचा कितीही वेगळा स्वभाव असला तरी ज्याचा जसा स्वभाव असेल तसा स्वीकारायचा आहे. आपण असेच मानायचे आहे, की ईश्वराने सृष्टीची रचना इतकी वैविध्यपूर्ण केलेली आहे, की कोणतीही वस्तू दुसऱ्या वस्तूसमान असत नाही.-------- .......... read more 1 24 14641 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 12/01/2023 02:01 PM Edit Delete धरतीला सावरण्याची जबाबदारी मानवाची सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमानिमित्त विशेष लेख. हा संत समागम २७, २८ व २९ जानेवारी, २०२३ रोजी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात डीएमआयसी मैदान, बिडकीन, पैठण रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. ईश्वराने धरतीची निर्मिती केवढीतरी सुंदर केलेली आहे; परंतु मानवाचा व्यवहारच मानवता विरहित झाला आहे. मनुष्य या सुंदर धरतीचा विध्वंस करत चालला आहे. खरं तर या धरतीला सावरण्याची जबाबदारी आम्हा मानवांचीच आहे. आपण आपल्या कर्मांद्वारे, आपल्या विचारांनी आणि आपल्या जीवनाद्वारे ही बाब ध्यानात ठेवायला हवी, की एखादी लहान-सहान गोष्टसुद्धा आपल्याकडून घडू नये जी या धरतीसाठी नुकसानकारक ठरेल. जसे एका शायरानेही म्हटले आहे, की- लम्हों ने खता की है और सदियों ने सजा पाई है। जर आपले कर्म आणि व्यवहार विपरीत दिशेने चाललेले असतील तर निश्चितपणे नुकसान होणार आहे, मग ते नुकसान आपले असो, समोरच्याचे असो, कोणाचेही, कोणत्याही रूपात असो. आपण स्वसुधार घडवून आणण्यावर लक्ष केंद्रीत करावे, सदोदित या परमात्म्याची जाणीव ठेवावी, क्षणोक्षणी त्याची भीती बाळगून जीवन व्यतीत करावे. या जाणीवेमध्ये राहिल्याने आपण जगाला सुंदर बनविण्यामध्ये आपले योगदान देऊ शकू. जेव्हा कोणी मनुष्य एखादे चांगले कार्य करत असेल तेव्हा आपल्या मनाला वाटते, की हे उत्तम कार्य आपण का करत आहोत आणि हे आपण कुठून शिकला? त्यानंतर आपणही ते सुंदर कार्य करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे जेव्हा आपण स्वत: चांगले काम करु लागू, स्वत:ला उत्तम मनुष्य बनवू तेव्हा प्रत्येकाला असे वाटू लागेल, की या व्यक्तीचे जीवन इतके सुंदर आहे, तिचे बोलणे गोड आहे, नेहमी इतरांच्या कामाला येते तेव्हा आपणही असे जीवन का न जगावे? मग तो मनुष्य जेव्हा जेव्हा भेटेल तेव्हा आम्हाला पुन्हा भेटण्याची इच्छा बाळगेल. हा मनुष्य चांगला नाही, याच्यापासून आपण दूर राहू असा विचार त्याच्या मनात चुकूनही येणार नाही. आपण स्वत: मनुष्य आहोत आणि ही निवड करण्याचा विकल्प जेवढा आपल्याजवळ आहे तेवढाच समोरच्याकडेही आहे. शरीरातील पाच तत्वांविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याच पाच तत्वापासून आपणही बनलो आहोत आणि तेही बनले आहेत. ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने आमच्या जीवनात काय परिवर्तन होते हे ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतरच कळते. ही तीच दृष्टी आहे जी आपल्याला स्वत:ची ओळख करुन देते. स्वत:ची ओळख झाल्यानंतर आपल्याला हे अवगत झाले, की समोरच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणताही फरक नाही तेव्हा प्रेम करणे शक्य होईल, हृदयातून द्वेषभावना निघून जाईल, मनातून भेदभाव दूर होतील आणि उरेल केवळ प्रेम आणि प्रेमच. आपण आपल्या जीवनामध्ये ते युग घेऊन यायचे आहे ज्याविषयी बोलले जाते, की ती पुरातन युगं फार चांगली होती आणि हे कलियुग चांगले नाही. खरं तर यामध्ये युगाची कोणतीच चूक नाही. चूक असेल तर ती मानवाची आहे. आपण आपले जीवन असे का न घडवावे ज्यायोगे आमच्यामनामध्ये रामराज्य येईल? आमच्या मनामध्ये हा ईश्यर अशा प्रकारे सामावून जायला हवा ज्यायोगे आपण मनामध्ये केवळ या निराकार प्रभूलाच वसवू, कोणत्याही दुष्ट भावनेला थारा देऊ नये, मनामध्ये विकार राहू देऊ नये. ईश्वराने कृपा करावी आणि जसे संतांनी, गुरु-पीर-पैगंबरांनी अपेक्षित केले तसे सुंदर जीवन प्रत्येकाचे व्हावे. आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने मानव बनून जीवन जगावे. आपण स्वत:बरोबरच समाजाचे आणि अवघ्या विश्वाचे भले करावे. ------- .......... read more 1 26 14639 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 09/01/2023 06:01 PM Edit Delete सांगली,मिरज कुपवाड शहर महानगर पालिका हद्दीतील चिन्मय पार्क ते संजयनगर रस्त्यास सदगुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचे नाव आध्यात्मिक जागृती द्वारे मानवामध्ये असलेल्या मानवी गुणाची ओळख करून देऊन जगामध्ये विश्वबंधुत्व प्रस्थापित करण्याचे महान कार्य करणारे निरंकारी मिशनचे तत्कालीन सदगुरु निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांचे नाव सांगली मिरज कुपवाड महानगर पालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मधील चिन्मय पार्क ते संजय नगर रस्त्यास देण्यात आले आहे. पूज्य मोहन छाब्राजी मेंबर इंन्चार्ज संत निरंकारी मंडळ दिल्ली व सांगलीचे महापौर माननीय श्री दिग्विजय सुर्यवंशी यांचे शुभहस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी महापौर सुर्यवंशी साहेब म्हणाले, की संत निरंकारी मंडळाच्या कार्याने मी प्रभावित झालो आहे. तसे तर माझ्या महापौर पदाच्या कार्य काळात अनेक सामाजिक कार्ये झाली आहेत; पण सदर रस्त्याचे नामकरण करण्याचे कार्य माझ्या हस्ते झाले हे मी माझे परमभाग्य समजतो यावेळी निरंकारी पूज्य मोहनजी छाब्रा जी म्हणाले की संत महापुरुषांनी सदैव मानव कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे विषयी बोलायचे झाले तर सूर्याला दिवा दाखवल्यासारखे होईल. सदगुरु बाबाजीनी मानवास मानव प्रिय असावा एकमेकाचा आधार बनावा अशी शिकवण समस्त विश्वाला दिली निरंकारी मिशन एक मानवतेचे मिशन आहे निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृती बरोबरच स्वच्छता अभियान,वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तसंकलन करणे इत्यादी सामाजिक कार्याद्वारे मानव सेवा हीच ईश्वराची सेवा या बाबाजीच्या शिकवणीनुसार कार्य करीत आहे. आज वर्तमान समयाच्या सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज हे कार्य अविरतपणे करित आहेत सदर रस्त्यास निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचे नाव दिल्याबद्दल त्यांनी महानगर पालिकेचे आभार मानले.यावेळी नगरसेविका कांचन कांबळे, समाजसेवक संजय कांबळे, श्री.नंदकुमार झांबरे, झोनल इन्चार्ज सातारा, श्री.अमरलाल निरंकारी झोनल इंचार्ज कोल्हापुर आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक व सेवादल अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले. ------------------------------------ .......... read more 1 71 14642 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 03/01/2023 07:01 PM Edit Delete पायापाचीवाडी ; राजे युथ फाऊंडेशन चे उद्घाटन सोहळा खूप मोठ्या प्रमाणात संपन्न झाला. या उद्घाटनचे प्रमुख अतिथी राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल दादा पाटील तसेच सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील सलगर चे सरपंच तानाजी आप्पा पाटील तसेच महावीर कागवाडे आबासाहेब चव्हाण नूतन ग्रामपंचायत सदस्य इतर मान्यवर राजे युथ फाऊंडेशनचे सर्व कार्यकारी सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे युथ फाऊंडेशनचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला राजे युथ फाऊंडेशन कडून सांगण्यात आलं की गावातील तमाम जनतेसाठी आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून ज्या कोणत्या गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी राजे युथ फाऊंडेशन सदैव तुमच्यासाठी तत्पर असेल तसेच विशाल दादांनी गावकऱ्यांना ग्वाही दिली की जिल्हा बँकेतून सर्व शेतकरी गटांना बेदाण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊ जयश्री वहिनींनी सांगितलं की मदन भाऊंचं पायापाची वाडी गाववरती विशेष ऋण आहेत तसेच तानाजी पाटील आप्पा यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी लवकर सोडण्यासाठी प्रयत्न करू व गावच्या हितासाठी तुमच्या सोबत सदैव राहो अशी ग्वाही दिली राजे युथ फाऊंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी उपस्थित राहून जो अनमोल वेळ दिला त्यासाठी सर्वांचे आभार मानले .......... read more 1 79 14636 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 30/12/2022 12:12 PM Edit Delete संत निरंकारी मिशन चारिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत सिंधी पुरुषार्थ हॉल परीट गल्ली शिवाजी चौक मिरज, वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंणदकर कोल्हापूर झोन नं 32 चे झोनल इन्चार्ज प.आ,अमरलाल जी निरंकारी ,सांगली सेक्टर प्रमुख जालिंदर जाधव जी, मिरज ब्रांच प्रबंधक सुनील पाटील जी ,सेवा दल इन्चार्ज उदय कांबळे जी व सर्व मिरज सात संगत यांच्या सर्वांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न होत आहे. तरी सर्वांनी रक्तदान करावे असे आव्हान केले आहे. मिरज सात संगत ने केले आहे. .......... read more 1 51 14641 views 0 comment 2 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 04/10/2022 01:10 PM Edit Delete सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन व पंचलिंग दुर्गा माता मंडळ यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर पायापाची वाडी तालुका मिरज येथे संपन्न झाले .यावेळी 175 रुग्णांनी याचा लाभ घेतला. नवरात्री निमित्त पायापाची वाडी येथे सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन मिरज व पंचलिंग दुर्गा माता मंडळ पायापाची वाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने हृदयविकार ,मेंदू विकार, मधुमेह ,बायपास ,नेत्र तपासणी यावर मोफत तपासणी केली गेली. .......... read more 1 28 14637 views 0 comment 1 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 19/09/2022 11:09 AM Edit Delete निरंकारी सद्गुरु माताजींच्या शुभहस्ते 75व्या वार्षिकसंत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभमुंबईसह महाराष्ट्रातूनही सेवेसाठी जाणार अनेक भक्तगण समालखा (हरियाणा), १९ सप्टेंबर, २०२२: १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत होणाऱ्या ७५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारम्भ निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे करण्यात आला. या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य, केन्द्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे सदस्य, सेवादलचे अधिकारी, स्वयंसेवक तसेच दिल्ली व आजुबाजुच्या क्षेत्राव्यतिरिक्त अन्य राज्यांतून मोठ्या संख्येने आलेले भाविक भक्तगण सहभागी झाले होते. सद्गुरु माताजींचे समागम स्थळावर आगमन होताच आदरणीय श्री.सुखदेवसिंह (समन्वय समिति कमिटी अध्यक्ष) व आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजा (सचिव संत निरंकारी मण्डल) यांनी त्यांचे हार्दिक अभिनन्दन केले. संत समागम सेवांच्या या शुभारंभाच्या प्रसंगी समस्त निरंकारी जगत तसेच प्रभु प्रेमी सज्जनांना संबोधित करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी म्हणाल्या, की सेवेची भावना समर्पणाने युक्त असायला हवी. सेवा ही आदेशानुसार व मनोभावे पूर्णतः समर्पित होऊन केली जाते आणि तेव्हाच ती सार्थक ठरते. सेवा हे केवळ एक काम किंवा कार्य नसून त्यामध्ये जेव्हा सेवेचा यथार्थ भाव सामावला जातो तेव्हा अशा सेवेचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. सेवा नेहमी जागरुकपणे करायला हवी. आमचे कर्म अथवा व्यवहार यामुळे कोणाचाही निरादर किंवा तिरस्कार होणार नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे. सर्व संतांचा आदर करावा. कारण प्रत्येकामध्ये हा निराकार निवास करत आहे. अशा भक्तीभावाने युक्त होऊन सेवा करावी आणि मनामध्ये ईश्वराचे स्मरण करत आपल्या सेवांचे योगदान देत जावे. निरंकारी संत समागमांची ही श्रृंखला अविरतपणे मागील ७४ वर्षांपासून यशस्वीपणे चालत आलेली असून ७५व्या भव्य वार्षिक संत समागमाची प्रतीक्षा प्रत्येक भक्त मोठ्या आतुरतेने करत आहे. सद्गुरु माताजींच्या पावन अध्यक्षतेखाली आयोजित होणाऱ्या या दिव्य समागमाचा भरपूर आनंद प्राप्त करण्यासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जन सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. त्यांची उचित व्यवस्था व्हावी यादृष्टीने समागम स्थळावर दररोज हजारो भक्तगण आणि सेवादल स्वयंसेवक आपल्या सेवा अर्पण करत राहतील. संत समागमाच्या सेवांमध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादल आणि भाविक भक्तगण टप्प्या-टप्प्याने व तुकड्या तुकड्यांनी समागम सेवेमध्ये भाग घेणार असून त्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील हजारो स्वयंसेवकांचा समावेश आहे. ७५व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये सहभागी होणाऱ्या समस्त भाविक-भक्तगणांना अधिकाधिक चांगल्या सुख-सुविधा प्रदान करण्याच्या हेतुने समागम स्थळावर शामियान्यांची एक सुंदर नगरी उभारण्यात येत असून त्यामध्ये भक्तांच्या निवासाची, चहापान व इतर मुलभूत सुविधांचा समावेश आहे. या सर्व सुविधांची व्यवस्था प्रशासन व अधिकाऱ्यांच्या सहयोगाने केली जाणार आहे. याशिवाय समागम स्थळावर विविध विभागांची कार्यालये, प्रकाशन स्टॉल, प्रदर्शनी, लंगर, कँन्टीन व डिस्पेन्सरी इत्यादि सुविधा उचित प्रमाणात उपलब्ध करण्यात येतील. वाहतूक व्यवस्थे अंतर्गत यावर्षीही रेलवे स्टेशन, बस स्थानके तसेच विमानतळावरुन समागम स्थळावर येणाऱ्या भक्तगणांसाठी येण्याजाण्याची उचित व्यवस्था केली जात आहे. याशिवाय अन्य वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था समागम स्थळावर केली जाणार आहे. अनेकतेत एकता एकतेचा अनुपम दृश्य प्रदर्शित करणारा हा दिव्य संत समागम दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी प्रेरणादायी व आनंददायक होईल, अशी अपेक्षा आहे. .......... read more 2 1 20 14639 views 0 comment 0 Shares SANTOSH KOSHTI, Sangli 10/08/2021 09:08 AM Edit Delete *आज दिनांक 9/8/ 2021 सोमवार रोजी माननीय संपर्क प्रमुख बानुगडे पाटील साहेब जिल्हाप्रमुख आनंद बापू पवार,संजय बापू विभुते यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी सो यांना निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले सदरच्या निवेदनातून अशी मागणी करण्यात आली की जुलै 2021 रोजी पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पूर आल्याने खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक हानी झाली होती त्यामुळे सांगली या ठिकाणी N.D.R.F व S.D.R.F (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल ) व ,(राज्य आपत्ती व्यवस्थापन दल ) याचे युनिट पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक मराठवाडा व कोकण यासाठी सांगलीला स्वतंत्र युनिट द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात आलेल्या प्रचंड महापुराने याचा मोठा फटका सांगली जिल्हाला बसला असल्याने तसेच या पुरात सांगली जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली होती तसेच सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर या जिल्ह्याचे व मराठवाडा,उत्तर कर्नाटक व कोकण यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून सांगली हे ठिकाण जवळ पडते त्या अनुषंगाने केंद्र सरकारने व राज्य सरकारने या ठिकाणी अनुक्रमे N.D.R.F व S.D.R.F चे युनिट तात्काळ मंजूर करावे सदरच्या युनिटमध्ये 1100 ते 1200 प्रशिक्षित जवानांची फौज असल्याने तसेच या युनिटमध्ये अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन याला मदत करण्यासाठी साधनसामुग्री असल्याने नागरिकांची तात्काळ जीवित हानी व आर्थिक हानी वाचणार आहे परिसरामध्ये नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास सदरच्या युनिटचा सांगली,सातारा,कोल्हापूर,सोलापूर,कोकण,मराठवाडा,व उत्तर कर्नाटक या परिसराला सांगली येथे N.D.R.F व S.D.R.F एन.डी.आर.एफ चे युनिट झाल्यास आपत्तीग्रस्त लोकांना सदरच्या युनिटच्या माध्यमातून तात्काळ मदत पोहोचून सर्वसामान्य नागरिकांचे जीवित हानी वित्तहानी वाचण्यास मदत होणार आहे त्यानुषंगाने तात्काळ केंद्र सरकारने व राज्य सरकारने सांगलीला स्वतंत्र N.D.R.F ,व S.D.R.F एन.डी.आर.एफ चे युनिट मंजूर करावे तसेच सन 2019 साली मध्यप्रदेश सरकारने S.D.R.F एस.डी.आर.एफ (राज्य आपत्ती व्यवस्थापन दल ) मध्यप्रदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 52 जिल्ह्यामध्ये S.D.R.F एस.डी.आर.एफ चे युनिट मंजूर करून प्रत्येक जिल्ह्यात 15 जवानांचे युनिटचे छोटी छोटी टीम करून कार्यान्वित केले आहे मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये S.D.R.F एस.डी.आर.एफ (राज्य आपत्ती व्यवस्थापन दल) स्वतंत्र युनिट आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू करावे अशी मागणी सदरच्या निवेदनातून करण्यात आली यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अभिजित चौधरी साहेब यांनी शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन दिले की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करून मंजूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले* *यावेळी दिगंबर जाधव,सचिन कांबळे,रावसाहेब,घेवारे,प्रभाकर कुरळपकर,अनिल शेटे,लक्ष्मण वडर,बाळासाहेब मगदूम,जितेंद्र शहा,मानसी शहा,स्वप्नाली कुरळपकर,प्रकाश लवटे,सनत पाटील,संतोष पाटील,प्रसाद रिसवडे,सुशांत मधाळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते* .......... read more 4 3 19 14637 views 0 comment 23 Shares