logo

"मुर्शी येथे बंधाऱ्या त विना परवाना वाळू उत्खनन, तलाठ्याकडून खोटा पंचनामा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बेजबाबदार उत्तर"......*



सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे यांचे थेट मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री व कोकण आयुक्ताना तक्रारीचे पत्र*
*▪️देवरुख दि १४ डिसेंबर*
▪️साखरपा मुर्शी येथील बंधाऱ्यात अनधिकृत वाळू उत्खनन सुरु असून या संदर्भात तक्रार केली असता स्थानिक तलाठ्याने धक्कादायक उत्तर दिलें आणि त्यानंतर याचबद्दल तहसीलदार कार्यालयात विचारणा केली असता तिथूनही तसेच उत्तर मिळाले, हा सर्व प्रकार संशयास्पद असून याची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे यांनी एका तक्रार अर्जाद्वारे कोकण आयुक्त, राज्याचे महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
*श्री संदीप कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीचा मजकूर*

▪️मु.पो. मुर्शी या गावात जलजीवन मिशन हर घर जल या योजने अंतर्गत बंधारा व इतर
पाणी योजना ₹ ९०,४५,०००/- (अक्षरी नव्वद लाख पंचेचाळीस हजार रुपये) शासनाने खर्च करून पडत्या काळात गावात या योजनेपासून एकही थेंब पाणी मिळत नाही. शिवाय हे काम व खर्च ५० टक्के संशयास्पद असून त्याबद्दल गेले सहा महिने माहितीचा अधिकार मार्फत माहिती गोळा करणेचे काम सुरु आहे. जेणेकरून पुढील कार्यवाही सोपी होईल.परंतू दिनांक ०३/१२/२०२५ रोजी बंधाऱ्याची पाहणी करण्यास सकाळी ०९.१५ वाजता मी स्वतः बंधाऱ्याजवळ गेलो असता बंधाऱ्यात गावातील ८ ते १० महिला व १ पुरुष वाळू उत्खननाचे काम करताना आढळून आले. बंधाऱ्यात आणि बंधाऱ्याच्या बाहेर जवळ जवळ १२ ब्रास वाळू काढल्याचे दिसताच त्याच क्षणी जी.पी.एस. फोटो व मोबाईल विडीओ रेकॉर्डिंग करुन मी ठेवले. व तत्काळ मुर्शी गावचे तलाठी लोकरे यांना या गोष्टीची कल्पना दिली व ताबडतोब घटनास्थळी येऊन पाहणी करण्यास सांगितले असता तातडीने त्यांचे कोतवाल श्री. दळवी तिथे पोहोचले आणि
पोलीस पाटलांच्या मदतीने वाळू काढण्याचे काम थांबवून सर्व वाळू तिथे जप्त केली व सर्व कामगारांचे अंगठे सही घेवून एक यादी तयार केली. पुन्हा तलाठी लोकरे साहेब यांच्याशी पुढील कार्यवाही काय असेल असे मी फोन वर विचारले असता, "उद्या मी येऊन पंचनामा करतो व ती बाळू विस्कळीत करून टाकतो. असे पुरावा नष्ट करण्याचे त्यांनी भाष्य केले. (या संदर्भात रेकॉर्डिंग पुरावा उपलब्ध
आहे) त्यांच्या अशा संशयास्पद बोलण्यामुळे संपूर्ण प्रकारची लेखी तक्रार दिनांक ०३/१२/२०२५रोजीच मा. जिल्हा प्रांत साहेब व मा. तालुका तहसिलदार साहेब यांच्याकडे केली असता दुसऱ्याच
दिवशी दिनांक ०४/१२/२०२५ रोजी तलाठी लोकरे साहेब यांनी पंचनामा केला मात्र या चार
तारखेला केलेला पंचानामा तहसिलदार कार्यालयात दिनांक ११/१२/२०२५ पर्यंत पोहोचलेला नव्हता.

▪️मी याची वारंवार चौकशी केल्यानंतर दिनांक ११/१२/२०२५ रोजी दुपारी १ ते २ पर्यंत तहसिलं कार्यालयात पंचनामा जमा झाला.

▪️याच गोष्टीची चौकशी करण्यासाठी मी स्वतः तहसिलादार साबळे यांच्याकडे ११/१२/२०२५ दुपारी २.०० वाजता गेलो असता तहसिलदार यांनीही माझ्याशी उलट तपासणीच्या उद्देशाने बेजबाबदार भाष्य केले. चौकशी करणारे तुम्ही कोण? पंचयादी ची प्रत मागणारे तुम्ही कोण? आमच्याकडे तुमच्यासारखे १०० संस्था येतात. असे भाष्य केले. तरी माझ्या तक्रारीचा रीतसर आढावा घेऊन संबंधितवर कारवाई करावी अशी विनंती..

155
8185 views