उर्जा संरक्षणाच्या क्षेत्रातउल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी यांना पुरस्कार
पुणे, दि. १४ डिसेंबर २०२५ —
ऊर्जा संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी, संचालिका ब्रह्माकुमारीज जगदंबा भवन, पुणे यांना आज राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनानिमित्त संपूर्ण भारतातून “ऊर्जा संरक्षणासाठी सर्वोत्तम निवासी युनिट” या श्रेणीत भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या मानाचा पुरस्कारासाठी ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना, शाश्वत जीवनशैलीचा अवलंब तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे जगदंबा भवनची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली.
या सन्मानामुळे ब्रह्माकुमारीज संस्थेच्या ऊर्जा संवर्धनाबाबतच्या दूरदृष्टीला आणि समाजप्रबोधनात्मक कार्याला नवा गौरव प्राप्त झाला असून, देशभरात ऊर्जा बचतीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.