
*राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी तसेच भ्रष्टाचार निर्मुलन व पर्यावरण समिती यांच्या संयुक्त विदयमाने पदाधिका-यांना नियुक्तीपत्र प्रदान....!*
राष्ट्रीय अध्यक्ष अरूणभाऊ निटूरे व अनिल मेश्राम यांच्या आदेशानुसार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिभाऊ बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली,
राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी तसेच भ्रष्टाचार निर्मुलन व पर्यावरण समिती यांच्या संयुक्त विदयमाने , जेलरोड दसक येथील विठल्ल रखूमाई मंदिरात, पदाधिका-यांच्या उपस्थितीत पद नियुक्तीचा सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष शालिग्राम बनसोडे, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे शहराध्यक्ष,कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ होलीन, महाराष्ट्र प्रभारी भिकाभाऊ नाना गांगुर्डे, यांच्या उपस्थितीत जेष्ठ समाजसेवक:-राजाभाऊ धिवर यांची नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष पदी, सुषमाताई बोरसे यांची महिला आघाडी
प्रदेशाध्यक्षा पदी, सागर भंडारे यांची कार्यध्यक्षपदी,
सचिन नामदेव गुरूकुले यांची नाशिक शहराध्यपदी,
अमोल संपतराव कांबळे यांची प्रदेश सचिवपदी, नेहा सुरज भट यांची नाशिक महिला आघाडी जिल्हयाध्यपदी, वजीर मोहम्मद शेख यांची नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी, रविंद्र गाजरे यांची देवळाली कँम्प शहर अध्यक्षपदी, पत्रकार विजय खंडागळे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी शाल पुष्पगुच्छासह नियुक्ती पत्र प्रदान करून, नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी कोणावर अन्याय अत्याचार झाल्यास, भ्रष्टाचार झाल्यास, कोणाची आर्थिक फसवणूक झाल्यास, आम्ही जनतेच्या न्यायासाठी खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहु. असे मनोगत नियुक्ती झालेल्या महिला पुरूष पदाधिका-यांनी व्यक्त केले.