
मल्टी कमोडिटी एक्सचेंज एम.सी.एक्स.मार्फत भुम येथिल शासकीय आय टी आय काॅलेजमध्ये कार्यक्रम संपन्न
(धाराशिव प्रतिनिधी विकास वाघ)
शासकीय आय. टी.आय. कॉलेज भूम येथे दि २० रोजी भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच एम. सी. एक्स. च्या माध्यमातून आय. टी.आय. च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य श्री के. जे. पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून(सेबी) तसेच एम.सी.एक्स. चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री गणेश चौधरी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले. यात त्यांनी विद्यार्थ्यांना डिमॅट अकाउंट, फायनान्शियल मार्केट्स, कमोडिटीचे प्रकार, जागतिक स्तरावर सक्रिय असलेल्या कमोडिटीज, वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट, कमोडिटी व इक्विटी मध्ये असलेला फरक, तसेच सेबीच्या सारथी ॲप चे महत्व इत्यादीचे मार्गदर्शन केले. तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. हर्षद काळबंड सर
यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. संजीत अघाव सर यांनी केले. तसेच या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.