logo

खा. डॉ.अजित गोपछडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व शैक्षणिक साहित्य वाटप*


#येरगी येथे आरोग्य शिबिरात 226 लोकांची व विद्यार्थ्यी यांची तपासणी
#164 विद्यार्थ्यीना शैक्षणिक साहित्य वाटप
#४२ नागरिकांचे HB तपासणी

देगलूर : नांदेड जिल्हाचे राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछेडे साहेब, यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन येरगी येथे शैक्षणिक साहित्य वाटप व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकूण 226 जणांची तपासणी करण्यात येऊन यामध्ये उपकेंद्र येरगी येथे कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली असून व तसेच संशयित रुग्णांनाची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगनवाडी येथे 164 विद्यार्थ्यी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आल. सदरील शिबिराचे उदघाटन बालिका पंचायत राज सर्व टिम यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक नागोराव चव्हाण सर, आरोग्य विषय प्रमुख मार्गदर्शक उपकेंद्रचे डाॅ.किरण ठाकरे मॅडम हे होते. यामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली असून व तसेच संशयित रुग्णांनाची तपासणी पोट विकार, बि.पी. शुगर तपासणी, बीपी तपासणी,सामान्य आरोग्य तपासणी, या प्रसंगी संतोष पाटील येरगीकर, तंटामुक्त अध्यक्ष सायलु कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे, विश्वनाथ बागेवार, अशोक बरसमवार, सुरेश सोमवार, अंगणवाडीचे हाणमाबाई बरसमवार, गंगामणी दारलावार, शितल मटपती, नागमणी बरसमवार, मजुळा सिलमकुटवार, बालिका पंचायत राज चे सरपंच अंजली वाघमारे, उपसरपंच पुनम सुर्यवंशी, ग्रामसेवक महादेव दाणेवार, तंटामुक्त अध्यक्ष शिवकांत भुरळे, महादेव कुंचगे, मोनिका माळगे, रुक्मिणी भुरूळे, रूद्रानी चैडके, शिबीर यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील, प्रभाकर वाघमारे, इरवंत कालिंगवार, माधव ईज्जरवार, मल्लिकार्जुन मटपती, सर्व ग्राम पंचायत सदस्य, बालिका पंचायत राज, आरोग्य कर्मचारी आणि गावकऱ्यांनी परिश्रम केले. प्रास्ताविक संतोष पाटील येरगीकर यांनी केल आभार बालिका पंचायत राजचे तंटामुक्त अध्यक्ष शिवकांत भुरळे, सूत्रसंचालन राजुरे सर यांनी केल.#

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर येथील भाजपा कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले व नवीन इमारतीची पाहणीही केली. या प्रसंगी मंत्री अतुलजी सावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि मान्यवर उपस्थित होते.

4
1260 views