logo

'मराठी बोलता येत नाही का?' विचारत ट्रेनमध्ये मारहाण; तरुणाने घरी पोहोचताच वडिलांना फोन करुन......;

लोकल ट्रेनमध्ये धक्का लागल्याने झालेल्या वादातून मारहाण झाल्यानंतर तरुणाने आत्महत्या केली आहे. कल्याणमधील या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. धक्का लागल्यानंतर टोळक्याने मराठी बोलण्यावरुन त्याला मारहाण केली. मराठी-अमराठी वादावरुन झालेल्या मारहाणीनंतर तरुणाने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली. राहत्या घरात त्याने गळफास घेतला. अर्णव खैरे असं 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. 
अर्णव खैरे ट्रेनमधून प्रवास करत असताना गर्दीत आगे हो असं हिंदीत बोलला. यावेळी ‘मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलण्याची लाज वाटते का ? असं विचारत चार ते पाच जणांच्या टोळक्याने 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर धास्तावलेल्या 19 वर्षीय अर्णव खैरेने कल्याण कोळसेवाडी परिसरातील राहत्या घरी येताच गळफास घेतला असा वडिलांचा आरोप आहे. 
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसंच जितेंद्र खैरे यांचा जबाब नोंदवत सुरू केला तपास सुरु केला आहे. 
अर्णव खैरे हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी घटना घडली असून वडिलांना फोनवरून त्याने मारहाणीची माहिती दिली होती. यानंतर त्याने गळफास घेतला असं वडिलांनी सांगितलं आहे. 

163
5906 views