logo

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन*



*युवक-युवतींना प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन*

नांदेड, दि. 18 नोव्हेंबर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2025-26 चे आयोजन करण्याचे निश्चित झाले आहे. पुढे नमूद केलेल्या कला प्रकारामध्ये इच्छुक असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतींनी आपली नावे, प्रवेशिका 21 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय स्टेडीयम परीसर नांदेड येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यासन प्रमुख बालाजी शिरसीकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) संपर्क क्र. 9850522141, 7517536227 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांचे पत्रान्वये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रुपांतर VBYLD मध्ये करण्यात आले असून तो विकसित भारत 2047 या दृष्टिकोनाशी जोडण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर NYK-VBYLD-2026 चे आयोजन युवा कार्यक्रम व खेळमंत्रालयाकडुन केले जाणार आहे. त्यामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवकांचा सहभाग अपेक्षित आहे. यामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी निवडलेल्या पथकांमध्ये स्पर्धा खालील 4 मार्ग (Track) मध्ये NYF-VBYLD-2026 मध्ये दिल्ली येथे होणार आहेत. Cultural and Innovation Track, Viksit Bharat Challenge Track, Design for Bharat, Hack for Social cause त्यास अनुसरून जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्‍सव- सांस्कृतिक व नवोपक्रम (Cultural and Innovation Track) आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विकसित भारत जिल्हास्तर युवा महोत्सव सांस्कृतीक व नवोपक्रम मार्ग यामध्ये पुढीलप्रमाणे कला प्रकार संख्या अंतर्भुत आहेत.

सांस्कृतिक कला प्रकार
समुह लोकनृत्य (सहभाग संख्या 10), लोकगीत (सहभाग संख्या 10) कौशल्य विकास:- कथालेखन (सहभाग संख्या 3), चित्रकला (सहभाग संख्या 2, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या 2), कविता (500 शब्द मर्यादा सहभाग संख्या 3) असे एकुण 30 सहभाग संख्या राहील. या स्पर्धेमध्ये सहभागासाठी 15 ते 29 वयोगट राहील (12 जानेवारी 2026 या दिनांक रोजी वयाची परिगणना 15 ते 29 असावी) जन्म दिनांक बाबत सबळ पुरावे द्यावे लागेल.

युवा महोत्सव म्हणजे युवकाना आपले कलागुण दाखविण्याचे एक खुले व्यासपीठ आहे. यामध्ये युवकांचा सर्वागिण विकास करणे, देशाची संस्कृती व परपंरा जतन करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढिस लावणे, युवकांना विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना “Innovation in Sciecnce and Technology” चे महत्व पटवुन देणे, शिक्षण, उद्योग व्यवसाया सोबतच शेती या व्यवसायाशी युवकाची ओळख करून देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्त्व युवकाना पटवुन देणे इत्यादी बाबीवर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

या युवा महोत्सवामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभाग घेऊ शकतात. त्यांचे वय दिनांक 12 जानेवारी, 2026 रोजीची परिगणना करण्यात येईल. यात सहभागी होण्यासाठी जिल्हातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय, अभियांत्रीकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला मंडळ, महिला बचत गट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वंयसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), इत्यादी संस्थेतील युवक व युवती यांना सहभागासाठी आमंत्रीत करण्यात येत आहे. युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कलाप्रकारासाठी विजयी स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षीस, ट्राफीज देवुन गौरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर विजयी युवकांना विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याचा मान मिळणार आहे.
00000

9
51 views