
आदर्श कला क्रीडा सेवा मंडळ (सांबर गल्ली, नेहरू नगर, कुर्ला)
🩸 “रक्तदानहेच जीवनदान — रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान!”.....
राज्यातील विविध रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी होत असताना, सामाजिक बांधिलकी जपत आदर्श कला क्रीडा सेवा मंडळाने, आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी —
रविवार, दिनांक 09 नोव्हेंबर 2025 रोजी —
मंडळाच्या कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
या शिबिराला परिसरातील नागरिक, सभासद आणि युवकवर्ग यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राजावाडी ब्लड बँक, मंडळातील कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने करण्यात आले.
मंडळाचे पदाधिकारी श्री. संतोष तावडे, श्री. कौशिक साठम, श्री. विशाल मांडेलकर, श्री. विशाल केसरकर, श्री. रोहित दळवी, श्री. विवेक मांडेलकर, श्री. हेमंत मांढरे, श्री. विलास गायकर तसेच ज्येष्ठ पदाधिकारी श्री. जीवन खरात (निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त) यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
या सामाजिक उपक्रमाच्या यशात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या योगदान देणाऱ्या सर्वांचे
आदर्श कला क्रीडा सेवा मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.