logo

मुंबई विभागात शाहू महाराज विद्यालय राबाडा 17 मुले संघ खो- खो त प्रथम ,

राबाडा:- नवी मुंबई महानगरपालिका संचलित पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर रबाळे मधील 17 वर्ष मुले खो खो संघाने विभागीय स्तरावर सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे विजेत्या संघाचे कौतुक माजी महापौर सुधाकर सोनवणे ,रंजना सोनवणे, मुख्याध्यापक अमोल खरसंबळे, मुख्याध्यापिका स्नेहल विशे, केंद्र समन्वयक अविनाश जाधव, रमेश तेली यांनी अभिनंदन केले आहे.
सदर खेळाडूंना खो खो कोच प्रताप शेलार ,मनोज पवार, स्वप्निल पाटील ,अभिषेक परब तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक प्रा. अमोलकुमार वाघमारे, कमलेश इंगळे, दिनेश भोये,योगेश राज यांच मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे. विजेत्या संघातील अष्टपैलू खेळाडू आशिष गौतम, ओंकार सावंत, करण गुप्ता ,आशिष रत्नाकर, गणेश गायकवाड यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून वसई विरार मनपा, ठाणे ग्रामीण व मुंबई उपनगर संघाचा मोठ्या गुणाच्या फरकानी पराभव करत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धा रा.फ. नाईक विद्यालय कोपरखैरणे या ठिकाणी संपन्न झाल्या. या पुढील राज्यस्तरीय स्पर्धा 12 ते 14 नोव्हेंबर रोजी ब्रम्हनाथ विद्यालय ,अहिल्यानगर येथे होणार आहेत. विजेत्या संघातील खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0
597 views