
एकनाथ खडसेंच्या घरुन चोरी झालेले दागिने जप्त, 'त्या' CD बाबात पोलिसांकडून मोठी अपडेट समोर..... !
भाजपमधून राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केलेले आमदार एकनाथ खडसे यांच्या शिवराम नगर येथील निवासस्थानावर 27 ऑक्टोबरला रात्री चोरी केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून पाच संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. खडसेंच्या घरी चोरीच्या घटनेची राज्यभरात चर्चा झाली. कारण या चोरीत सीडीदेखील असल्याचा दावा करण्यात येत होता. दरम्यान पोलिसांनी चोरांकडून 6.21 लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व नगद रक्कम हस्तगत केली. सीडीबद्दल महत्वाची अपडेट समोर आलीय.
नेमकं काय घडलंय?
जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी खडसेंच्या घरी झालेल्या चोरीबद्दल अपडेट दिली आहे. चोरट्यांनी बंगल्यातील ताबडतोब खोल्यांमधील कपाटे उघडून लूट केली. प्रथम गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मिळाल्याने मालक जियाउद्दीन हुस्नोद्दीन शेख (जळगाव) याला पोलिसांनी पकडले. त्याने उल्हासनगर येथील नातेवाईक मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला चौधरी, एजाज अहमद उर्फ सलीम चौधरी व बाबा यांच्या सहभागाची कबुली दिली. चोरलेला माल चिराग सय्यद (उल्हासनगर) ने कल्याण येथील कैलास खंडेलवाल याला विकला होता. दरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. खडसे मूळतः मुक्ताईनगर तालुक्यात राहतात. त्यामुळे बंगला बंद असल्याने चोरांना सोपा प्रवेश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
काय गेलं चोरीला?
खडसेंच्या घरी चोरट्यांनी 868 ग्रॅम सोने (अंदाजे 6 लाख रुपये), 35 हजार नगद रक्कम व चांदीचे वस्तू लंपास केल्या. घरातील 25 ते 30 पेन ड्राइव्ह व 10 पैकी 7 सीडी गायब झाल्या, उर्वरित सीडी सुरक्षित आहेत, पण बेडरूम कपाटातील एका पिशवीतील संवेदनशील सीडी व कागदपत्रे अद्याप मिळाली नाहीत, अशी माहिती खडसे यांनी तक्रारीत दिली होती. हा चोरीचा माल चोरांनी विक्रीसाठी कल्याणमार्गे नेल्याचे उघड झाले.
एकनाथ खडसे काय म्हणाले?
घरी झालेल्या चोरीबद्दल खडसेंनी प्रतिक्रिया दिलीय. कामाच्या मुख्य सीडी वेगळ्या ठिकाणी सुरक्षित आहेत, पण चोरांनी कपाटातील काही सीडी व पेन ड्राइव्ह नेले. ही सामान्य चोरी वाटत नाही, असे खडसेंनी म्हटले. भाजप सोडल्यानंतर खडसे यांनी अनेकदा ईडी कारवाया असेल तर आमच्याकडे सीडी आहेत’ असा इशारा दिला होता. भाषणावेळी आणि पत्रकार परिषदांत ते सीडीचा उल्लेख करायचे. “वेळ आली तर भ्रष्टाचाराचे पुरावे जगासमोर आणीन.”, असे खडसे वेळोवेळी सांगायचे. आता या सीडीसाठीच चोरी झाली का, असा संशय उपस्थित होतोय. खडसे यांचे कुटुंब मुंबई, पुणे व दिल्लीत असल्याने बंगल्यावर सुरक्षा नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजकीय षड्यंत्र?
पोलिसांनी गुन्हा दाखल करून विशेष पथके नेमली असून, उल्हासनगर व कल्याणमध्ये छापे टाकले. डीएसपी नितीन गणपुले यांनी सांगितले, आरोपींच्या चौकशीतून डिजिटल पुराव्यांचा उलगडा होणार आहे. खडसे यांनी सुरक्षेसाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली.
प्रश्न: पोलिसांनी चोरी प्रकरणात किती आरोपी पकडले आणि काय मुद्देमाल जप्त केला?
उत्तर: जळगाव पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली – जियाउद्दीन शेख (जळगाव), मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला चौधरी, एजाज अहमद उर्फ सलीम चौधरी, बाबा (उल्हासनगर) आणि चिराग सय्यद व कैलास खंडेलवाल (कल्याण). त्यांच्याकडून ६ लाख २१ हजार रुपयांचे सोने (८६८ ग्रॅम), चांदी व ३५ हजार नगद जप्त झाले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही हस्तगत केली.
प्रश्न: एकनाथ खडसे यांनी चोरी झाल्याचा दावा केलेल्या सीडी व पेन ड्राइव्हचा काय अपडेट आहे?
उत्तर: घरातील २५-३० पेन ड्राइव्ह व १० पैकी ७ सीडी अद्याप सापडलेल्या नाहीत. खडसे यांनी सांगितले की, मुख्य कामाच्या सीडी वेगळ्या ठिकाणी सुरक्षित आहेत, पण बेडरूम कपाटातील एका पिशवीतील संवेदनशील सीडी गायब आहेत. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनीही डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचे सांगितले.
प्रश्न: ही चोरी सामान्य लूट आहे की राजकीय षड्यंत्र? खडसे यांचा याबाबत काय दावा आहे?
उत्तर: खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर अनेकदा ‘ईडीकडे कारवाया असतील तर आमच्याकडे सीडी आहेत’ असा इशारा दिला होता. आता या संवेदनशील सीडीसाठीच चोरी झाली का, असा संशय उपस्थित होतोय. खडसे म्हणाले, “चोरांनी थेट बेडरूममध्ये जाऊन निवडक वस्तू नेल्या, हे सामान्य चोरी वाटत नाही.” पोलिस तपासातून खरा हेतू उघड होईल.