logo

रेवनाळ हायस्कूलमधील वरिष्ठ शिक्षिका सौ. सुवर्णा दिलीप वाघमोडे यांना पद्मश्री सौ. सिंधुताई सपकाळ (माई) महाराष्ट्र रत्न पुरस्कार – 2025” जाहीर झाला आहे,

रेवनाळ - रेवनाळ हायस्कूलमधील वरिष्ठ शिक्षिका सौ. सुवर्णा दिलीप वाघमोडे यांना शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “पद्मश्री सौ. सिंधुताई सपकाळ (माई) महाराष्ट्र रत्न पुरस्कार – 2025” जाहीर झाला आहे. हा सन्मान त्यांच्या शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील योगदानाचा गौरव म्हणून प्रदान करण्यात येत आहे.
सौ. वाघमोडे या महाराणी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था, सांगली संचलित रेवनाळ हायस्कूल, रेवनाळ येथे गेली 28 वर्षे गणित व विज्ञान विषयाच्या कुशल अध्यापिका म्हणून सेवा बजावत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा एस.एस.सी. निकाल नेहमीच 100% राहिला असून विद्यार्थ्यांनी गुणवंतांच्या यादीत नाव नोंदवले आहे.
संस्थेचे चेअरमन मा. आर. एस. चोपडे सर यांच्या प्रेरणेतून सौ. वाघमोडे यांनी विद्यालयात “अहिल्या पॅटर्न” प्रभावीपणे राबविला आहे.
तसेच “मुख्यमंत्री माझी शाळा” उपक्रमांतर्गत शाळेला मिळालेल्या यशात त्यांचे योगदान लक्षणीय राहिले आहे.
शाळेतील ज्येष्ठ व प्रबोधनशील शिक्षिका म्हणून त्या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना सतत प्रेरणा व मार्गदर्शन देत असतात.
ग्रामीण भागातील वंचित, उपेक्षित व गरजू घटकांसाठी त्यांनी निःस्वार्थपणे कार्य केले असून, विशेषतः महिला सक्षमीकरण व शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक उन्नतीचा संदेश देणे हे त्यांचे जीवनध्येय राहिले आहे.
सौ. वाघमोडे यांना यापूर्वी ‘आदर्श माता पुरस्कार’ (सुसंगत फाउंडेशन, पुणे) तसेच अनेक स्थानिक आणि विभागीय सन्मान प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत पद्मश्री सिंधुताई सपकाळ (माई) महाराष्ट्र रत्न पुरस्कार समिती, पुणे यांनी त्यांची निवड केली आहे.
हा मानाचा पुरस्कार दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ येथे आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या गौरवाची घोषणा होताच रेवनाळ परिसरात आनंदाची लाट उसळली असून ग्रामस्थ, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सौ. सुवर्णा वाघमोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
छोट्या ग्रामीण भागातून राज्यस्तरीय असा मानाचा सन्मान मिळवणे हे रेवनाळ गावासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरले आहे.
रेवनाळ ग्रामस्थ आणि संपूर्ण जत तालुक्याच्या वतीने
सौ. सुवर्णा दिलीप वाघमोडे यांचे हार्दिक अभिनंदन!

422
5786 views