logo

₹11100000 ची रोकड जप्त; दाखवायला चहाचं दुकान, आत नोटा छापण्याचा धंदा: पोलीसच निघाला....

कोल्हापूर: बनावट नोटा छपाई करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत तब्बल एक कोटींच्या बनावट नोटांसह मुद्देमाला सांगली पोलीसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली,असून धक्कादायक बाब म्हणजे कोल्हापूरचा एक पोलीस कर्मचारी याचा मास्टर माईंड निघाला असून त्याच्या चहाच्या दुकानात हा बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरू होता.
सांगलीच्या महात्मा गांधी चौकी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट नोटा छापणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे.या टोळीकडून तब्बल 99 लाख 23 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे.
बनावट नोटांच्या टोळीचा छडा मिरजेत विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमाला पकडण्यात आल्या नंतर लागला. त्याच्याकडून 42 हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्यानंतर पोलीस चक्रावून गेले, याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता कोल्हापूर मधल्या रुईकर कॉलनीमध्ये या बनावट नोटा छापायचा उद्योग सुरू असल्याचे समोर आले,मग सांगली पोलिसांनी थेट कोल्हापूरमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना जे दिसलं ते पाहून पोलीस थक्क झाले,कारण एका चहा विक्रीच्या दुकानांमध्ये बनावट नोटांच्या छपाईचा कारभार सुरू होता,ज्यामध्ये महागडं कलर झेरॉक्स मशीन,छपाई साठी लागणारा साहित्य जप्त करण्यात आलं.
पण धक्कादायक बाब म्हणजे या बनावट नोटांच्या टोळीचा मास्टरमाइंड कोल्हापूर पोलीस दलातला एक पोलीस कर्मचारी निघाला,इब्रार इनामदार,या पोलीस हवालदाराचे नाव असून त्याच्या सिद्धकला चहा विक्रीच्या नावाखाली हा सर्व बनावट नोटांचा उद्योग सुरू होता.मुंबईतल्या आणि कोल्हापूर मधल्या साथीदारांच्या मदतीने इब्रारचा हा बनावट नोटांचा गोरख धंदा एका अपार्टमेंटमध्ये सुरू होता.
इब्रार हा कोल्हापूर पोलीस दलातील मोटार परिवहन विभागात कर्मचारी असल्याचे समोर आलं आहे,याशिवाय तो सिद्धकला चहा विक्रीचा व्यवसाय करत होता,पण या चहा विक्रीच्या नावाखाली बनावट नोटांचा उद्योग देखील करत होता,ज्यामध्ये कोल्हापूर शहरातील एका अपार्टमेंट मध्ये रोजरासपणे चहा विक्रीच्या नावाखाली या बनावट नोटा छापल्या जायच्या,मग त्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात विक्री केल्या जायच्या.
कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस शिपाई इब्रार इनामदार हा गेल्या सात दिवसापासून सुट्टीवर असल्याची माहिती मिळाली. ही सुट्टी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटा वितरित करण्यासाठी घेतली का ? याचा देखील कसून तपास सुरू आहे.
बनावट नोटांच्या टोळीतल्या मास्टरमाइंड इब्रार इनामदार सह मुंबईतला एक व कोल्हापूर मधले साथीदार,असे पाच जणांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे,त्यांना 13 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इब्राराच्या टोळीकडून तब्बल 99 लाख 23 हजारांच्या बनावट नोटा मुंबईकडे पाठवण्यात येत होत्या,पण सांगली पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बनावट नोटा वेळीच पकडल्या आणि बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश देखील केलाय. मात्र चहावाल्या पोलिसाचा बनावट नोटांचा हा उद्योग महाराष्ट्रभर पसरलेला आहे,त्यामुळे आता हे बनावट नोटांचे जाळे उद्धवस्त करण्याचं आव्हान सांगली पोलिसांबरोबर महाराष्ट्र पोलिसांच्या समोर देखील असणार आहे.

प्रश्न: बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कसा आणि कोणत्या ठिकाणी झाला?

उत्तर: सांगलीच्या महात्मा गांधी चौकी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने मिरजेत विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला पकडून तपास सुरू केला. त्याच्याकडून ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळल्यानंतर कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीतील एका चहाच्या दुकानात छापा टाकला गेला. तेथे कलर झेरॉक्स मशीन आणि छपाई साहित्य जप्त करून टोळीचा छडा लावण्यात आला. या कारवाईत ९९ लाख २३ हजार ६०० रुपयांच्या बनावट नोटा (५०० आणि २०० रुपयांच्या) हस्तगत झाल्या.

प्रश्न: या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय?

उत्तर: टोळीचा मास्टरमाईंड कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार इब्रार इनामदार असल्याचे उघड झाले. तो मोटार परिवहन विभागात कार्यरत असून, सिद्धकला नावाच्या चहाच्या दुकानाचा मालक आहे. या दुकानाच्या नावाखाली आणि शहरातील एका अपार्टमेंटमध्ये मुंबई व कोल्हापूरच्या साथीदारांच्या मदतीने बनावट नोटांचा उद्योग चालवला जात होता. गेल्या सात दिवसांपासून तो सुट्टीवर असल्याचे समोर आले असून, दिवाळीपूर्वी वितरणासाठी ही सुट्टी घेतल्याचा संशय आहे.

प्रश्न: या प्रकरणात किती जणांना अटक करण्यात आली आणि पुढील कारवाई काय?

उत्तर: इब्रार इनामदारसह मुंबईतील एक आणि कोल्हापूरमधील साथीदारांसह एकूण पाच संशयितांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बनावट नोटा मुंबईकडे पाठवल्या जात असल्याने राज्यभरातील जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे, ज्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वितरणाचा कट समोर येण्याची शक्यता आहे.

244
6323 views