logo

नाशिकच्या पालकमंत्रीपदावर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा; कधी सोडणार तिढा.....?

नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटण्याचं नाव घेत नाहीय. नाशिकच्या पालकमंत्रीपदावर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा आहे. त्यातच आता नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्रीच हतबल झाल्याचं दिसतंय. 
नाशिकचं पालकमंत्रीपद हे महायुतीसाठी डोकेदुखी झालेलं आहे. आता तर चक्क मंत्री महोदयही पालकमंत्रीपदावरून हतबल झाल्याचं दिसतंय. शेतक-यांना मदत मिळेल, लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळतील. मात्र पालकमंत्रीपदाबाबत नाही सांगता येणार नाही, असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय.
तर काही दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांनीही यावरून मिश्किल टिप्पणी केली होती. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारी न्यावा लागणार असल्याचं मिश्किल वक्तव्य दादा भुसेंनी केलं होतं.
दरम्यान सगळं काही होईल, शेतकऱ्यांना मदत मिळेल, लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळतील, पण दिवाळीपूर्वी नाशिकचा पालकमंत्री जाहीर होणार नाही,’’ अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. यात नाशिक जिल्ह्यासाठी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्र म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या निर्णयाला शिवसेना नेत्यांकडून विरोध झाल्यामुळे अवघ्या एका दिवसातच पालकमंत्रीपदाची घोषणा स्थगित करण्यात आली होती. यानंतर अद्यापही महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या निमित्तानंही पालकमंत्रीपदाचा वाद उफाळून आला होता. आता पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून मंत्रीच हतबल झालेले दिसताहेत. त्यामुळे हा वाद कसा मिटवला जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

1: नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद कशाबाबत आहे?
उत्तर: नाशिक पालकमंत्रीपद महायुतीसाठी डोकेदुखी ठरले आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) यावर दावा करत आहेत. या वादामुळे नियुक्ती अद्याप झालेली नाही.
2: मंत्री गिरीश महाजन यांनी काय म्हटले?
उत्तर: मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मदत मिळेल, लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, पण पालकमंत्रीपदाबाबत कधी निर्णय होईल हे सांगता येत नाही. ते या पदावरून हतबल झाल्याचे दिसत आहे.
3: दादा भुसे यांनी याबाबत काय टिप्पणी केली?
उत्तर: मंत्री दादा भुसे यांनी मिश्कील टिप्पणी करत म्हटले की, नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारी न्यावा लागेल. ही टिप्पणी वादाच्या तीव्रतेवर उपरोधिक आहे.

84
2399 views