logo

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावतीने धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त भागातील गावात जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप


शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते वाटप

धाराशिव - (जिल्हा प्रतिनिधी - विकास वाघ)
धाराशिव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर स्थितीमुळे सर्वसामान्य जनतेचे बेहाल झाले आहेत. अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. अशा परिस्थितीत मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेतून शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या वतीने पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त गावातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप करण्यात आल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते पूरग्रस्त भागात या किट देण्यात आल्या.

धाराशिव तालुक्यातील येडशी, जवळा, दुधगाव, तडवळा, ढोकी या गावात 50 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट देण्यात आल्या आहेत. आणखी बाधित कुटुंबाच्या नोंदी घेऊन त्यांनाही किट वाटप करण्यात येणार आहेत.

धाराशिव जिल्ह्याला ओला आणि कोरडा दुष्काळ नेहमीच सतावत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, नागरिकांनी खचून न जाता निसर्गाच्या प्रकोपाला धैर्याने सामोरे जावे, असे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगून पूरग्रस्त जनतेला दिलासा दिला.

यावेळी शिवसेनेचे धाराशिव शहरप्रमुख आकाश कोकाटे, उपतालुकाप्रमुख रामेश्वर मगर, येडशीचे उपसरपंच सुनील शेळके, सोमनाथ बेंद्रे, सुनील पाटील, मनोज गुरव, मच्छिंद्र पवार, महेश पवार, दुधगावच्या सरपंच सौ. शीला पुरी, उपसरपंच मिनाज पटेल, अच्युत पुरी, ग्रामपंचायत सदस्य पप्पू कसबे, हसन पठाण, शहानूर शेख, महेंद्र चव्हाण, रामभाऊ पुरी, दादुमिया पठाण, कसबे तडवळा येथे सुनील डिकरे,
शहाजी पानढवळे, बाबा भोसले, पांडुरंग अंकुशे, अरविंद पानढवळे, दिलीप मुळूक, ढोकी येथे बांधकाम सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण डोलारे, उपतालुकाप्रमुख काका वाकुरे, ग्रामपंचायत सदस्य विमलताई डोलारे,
जवळा येथे उपसरपंच आप्पासाहेब गाढवे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय जाधव, मनोज जाधव, आप्पा कोळी, लखन वाघमारे, राजेंद्र जाधव, गणेश जाधव आदीसह संबंधित गावातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

5
302 views