logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बेलापुरातील प्रवरा नदीपात्रात अज्ञात व्यक्तींची उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न ; दुपारपासून नदीपात्रात शोधमोहीम व बचावकार्य सुरु...

बेलापूर प्रतिनिधी : आज सकाळी सुमारे ११
वाजण्याच्या सुमारास बेलापूर येथील प्रवरा नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीने अचानक उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर नगरपरिषदेचे बचाव दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. आज दुपारपासून अथक प्रयत्न करूनही अद्याप त्या संबंधित व्यक्तीचा शोध लागलेला नाही.

दरम्यान, बेलापूर दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी संपत बडे व भारत तमनर यांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य पाहण्यासाठी पुलावर व नदीकाठावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती; मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. उडी घेणारी व्यक्ती कोण होती आणि तिने नदीत उडी का घेतली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. बेलापूर पोलिसांनी घटनास्थळी चौकशी सुरू केली असून बचाव कार्य सुरूच आहे. या घटनेकडे संपूर्ण बेलापूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

204
7804 views

Comment