logo

महाराष्ट्रातल्या सगळ्या पराभूत पक्षांनी स्वतः हीं काही मेहनत घ्यावी.* प्रमोद शिंदे......


मागील वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या, भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट विजयी झाले, परंतु या विजयी पक्षाची कार्यालये सोडली तर संपूर्ण महाराष्ट्रात शुक शुकाट होता. भयाण शांतता होती, संशय व तणावाचे वातावरण होते, बंद, बंड, बैठक, सभा होत होत्या, मारकरवाडी सारखे गाव बंड पुकारून उभे होते. कारण होतं, निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निकाल, हा निकाल महाराष्ट्रासाठी पूर्णपणे अनपेक्षित होता.
यात 288 पैकी भाजपाला 132 मिळतात, शिंदे गटाला 57 जागा मिळतात तर अजित पवार यांना 41 जागा मिळतात तर अपक्षांना 12 जागा मिळतात. म्हणजेच 288 पैकी 230 जागा म्हणजेच 80 % जागा मिळतात, यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नव्हतं, कारण सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचं भाजपा शिंदे गट व अजित पवार गटाला 48 पैकी फक्त 17 जागा मिळतात म्हणजेच फक्त 35 % जागा, मग अवघ्या 6 महिन्यात असा काय मोठा बदल महाराष्ट्राच्या भावा बहिणीच्या विचारसरणीत झाला होता, हाच प्रश्न महाराष्ट्राला पडला होता त्यातल्या त्यात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 288 पैकी 145 चे बहुमत लागते, यात भाजपाला मिळालेल्या आकड्यांकडे नीट लक्ष दिल्यास हे कळते, नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ठरवून नियोजनबद्ध जागा स्वतःच्या पारड्यात पाडून घेतल्या आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी दगा देण्याचा प्रयत्न केल्यास किंवा ब्लॅक मेल करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या थोबाडात मारून त्यांना शांत करता येईल, आणि हा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी एकदा करूनही पाहिला, त्यावेळी एकनाथ शिंदे यांचं काय झालं हे महाराष्ट्राला माहिती आहे, एकनाथ शिंदे यांना भर सभागृहात मोदी शहा यांना वाकून मुजरा घालताना महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळेच की काय यावर अजित पवार यांनी शांत राहण्याची भूमिका घेतली, ED, CBI व तुरुंगात जाण्यापासून स्वतः व स्वतः सोबतच्या इतर आमदाराला सुरक्षित ठेवण्यासाठी गुपचूप सत्तेचा मलिदा खात देवेंद्र फडणवीस याचे शेपूट धरून राहणे अजित पवार यांनी स्विकारले तर एकनाथ शिंदे यांना कोंडमारा करत जबरदस्तीने स्वीकारायला भाग पाडले गेले.
आता मुद्दा आहे, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या वोट चोरी या सत्याचा! पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुराव्यासह कर्नाटकातील महादेव पुरा येथे वाढलेल्या मतांचा लेखा जोगा अगदी शेकडो पत्रकारासमोर निडरपणे मांडला, राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तरे भाजपा काय स्वतः निवडणूक आयोगहीं देऊ शकलेले नाहीय, यावर निवडणूक आयोगाने काय बालिशपणा केला तो जगाने पाहिला, महिला वोटर चे विडिओ देता येतील का? म्हणून उपस्थित पत्रकारांना प्रश्न केले, तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रति प्रश्नांना नेक्स्ट म्हणत केराची टोपली दाखवली.
त्यानंतर राहुल गांधी दुसरी पत्रकार परिषदही घेतली, पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कशा पद्धतीने मतदार वाढवले गेले, हे सांगितले तर दुसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी मतदार कश्या पद्धतीने एका ठिकाणी कमी केले जातात तर दुसऱ्या ठिकाणी वाढवले जातात हे सांगितले यात त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा क्षेत्रात 6050 मतदार वाढवले गेले हेही जाहीर केले.
यामुळे या संपूर्ण देशातील नागरिकांना भारतातील पराभूत विरोधी पक्षांना एक दिलासा मिळाला होता, तसे तर इथे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर जी यांनी निवडणूक आयोगाला कोर्टात खेचलेच होते, परंतु त्यांना या वोट चोरी मुद्द्यावर जनतेची साथ मिळत नव्हती, इतर पक्षही सोबतीला येत नव्हते, कारण योग्य ते पुरावे आता पर्यंत बाहेर आले नव्हते, त्यामुळे या पक्षात आत्मविश्वास दिसून येत नव्हता. पण आता राहुल गांधी मोठा धमाका करत पुरावे बाहेर काढलेत, अगदी दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र च्या निवडणुका धोका व लबाडी करत वोट चोरीने जिंकल्या आहेत असेच जाहीर केले, अगदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच लबाडी करून खासदार झालेत, नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या लोकसभा क्षेत्रातही वोटचोरी झालीय हे राहुल गांधी यांनी जाहीर केले, त्यानंतर बिहार मध्ये वोट अधिकार यात्रा काढली गेली, तीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला, महाराष्ट्रासह देशभरातील नेत्यांनी या यात्रेला पाठिंबा दिला, ते सहभागी झाले.
आता माझे महाराष्ट्र राज्यातील पराभूत पक्ष व त्यांचे उमेदवार ज्यांना खात्री होती की आम्ही जिंकणार परंतु ते पराभूत झाले व ज्यांना स्वतः च्या पराभवाबद्दल संशय येतोय, त्या सर्व पक्षाच्या नेत्यांना असे सांगणे आहे की कावळ्यासारखे दुसऱ्याच्या घरट्यावर स्वतः चं भविष्य सुरक्षित राहील असा विचार करू नका, आता तरी बाहेर पडा, बोला, राहुल गांधी यांनी र नरेंद्र मोदी, अमित शहा व राष्ट्रीय स्वयं सेवक संघ कशा पद्धतीने लबाडी करतोय याचं सत्य समोर आणले आहे. आता ते पडताळणी चे मोठे कार्य तुम्ही पराभूत झालेल्या विधानसभा व लोकसभा क्षेत्रात करा. मतदार यादी चाळा, नविन घुसवलेले व कमी केलेले तुमचे मतदार शोधा. पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासमोर मांडा एकट्या काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्या जीवावर राहू नका.
आता महाराष्ट्रातील मोठे नेते म्हणून शरद पवार यांनी हे पुढे येऊन आघाडीतील नेत्यांना राहुल गांधी ज्या प्रमाणे मतदार क्षेत्रात चाळणी करत आहेत तसें तुमच्या क्षेत्रात ही करा हे सांगायला हवे होते, जर दुसरे परके वाटतं असतील स्व पक्षातील नेत्यांना तरी सांगा. राज ठाकरे जी, उद्धव ठाकरे जी, प्रकाश आंबेडकर जी, बच्चू कडू जी उठा, हला, स्वतःच्या पक्षातील इतर नेत्यांना हलवा, कामाला लावा.
तुम्ही फक्त पुढे या!

प्रमोद शिंदे
सचिव, मुंबई प्रदेश
संभाजी ब्रिगेड,
9967013336

81
4225 views