logo

भारतात +91 नं का सुरू होतात मोबाईल क्रमांक? अर्ध्या देशाला कल्पनाच नाही......

रोजच्या जगण्यामध्ये पाहण्यात आणि बोलण्यात, वापरात कैक गोष्टी येतात. याच गोष्टींसंदर्भातील प्रश्नसुद्धा अनेकांना पडतात. मात्र कामाच्या घाईगडबडीत हे प्रश्न मागे पडतात. हो, पण त्यांची उत्तरं जेव्हाजेव्हा समोर येतात तेव्हा थक्क व्हायला होतं हे खरं. असाच एक प्रश्न म्हणजे मोबाईल क्रमांकांसंदर्भातला. 

सांगा बरं, +91 नं का होते मोबाईल क्रमांकाची सुरुवात? 

आंतरराष्ट्रीय प्रणालीमध्ये यासंदर्भातील प्रश्नाचं उत्तर असून, International Telecommunication Union (ITU) कडून त्याबाबतच्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवलं जातं. ही एक अशी संस्था आहे, जी जगभरातील टेलिकम्यूनिकेशन प्रणालीवर नियंत्रण ठेवते. 

ITU चा नेमका अर्थ समजून घेणंही महत्त्वाचं...

ITU नं जेव्हा जगभरातील 'इंटरनॅशनल कॉलिंग कोड' निश्चित केले, तेव्हा संपूर्ण जगाची विभागणी विविध भौगोलिक कक्षा अर्थात जिओग्राफिक झोनमध्ये करण्यात आली. यामध्ये प्रत्येक विभागाला एक खास आकडा देण्यात आला. भारताचं स्थान 9 व्या विभागात येत असून यामध्ये दक्षिण आशिया, पश्चिम आशिया, मध्य आशिया आणि मध्यपूर्वेकडील देशांचा समावेश आहे. ज्यामुळं या विभागाला +91 हा कोड देण्यात आला. 

हेसुद्धा वाचा : मुंबईतील आणखी एक ठिकाण इतिहासजमा होणार? सामान्यांवरही परिणाम... 

+91 कोड मिळण्यामागचं कारण काय? 

देशांसाठीचे कॉलिंग कोड निश्चित केले जात असताना काही गोष्टी लक्षात घेण्यात आल्या 
- देशाची लोकसंख्या
- देशाचं आर्थिक महत्त्वं
हे त्यातील महत्त्वाचे घटक असून, ज्या देशांची लोकसंख्या असून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. त्यांना सोपे आणि लक्षात राहण्याजोगे कोड देण्यात आले. लोकसंख्येच्या हिशोबानं भारत हा जगातील दुसरा मोठा देश असल्यानं आणि देशाची आर्थिक व्यवस्थासुद्धा भक्कम असल्यानं देशाला दोन अंकी, लहानसा कोड मिळाला, जो होता +91. 

+91 काम कसा करतो माहितीये? 

जेव्हा एखादी परदेशी व्यक्ती भारतात फोन लावते तेव्हा सर्वप्रथम +91डायल ,करमणं अपेक्षित असतं. यानंतर एरिया कोड (उदा. दिल्लीसाठी 11, मुंबईसाठी 12) किंवा वरील कोडनंतर मोबाईल- लँडलाईन क्रमांक डायल केला जातो. 
भारताच्या शेजारी राष्ट्रांचे कोड माहितीयेत? 
अमेरिका (US)  +1
यूनाइटेड किंगडम (UK) +44
कनाडा  +1
रूस  +7
ऑस्ट्रेलिया +61
सिंगापुर  +65
भारत-  +91:
पाकिस्तान +92
श्रीलंका  +94
बांग्लादेश  +880 
संयुक्त अरब अमीरात (UAE) +971

FAQ

भारताचा कॉलिंग कोड +91 का आहे?
+91 हा कोड ITU ने भारतासाठी निश्चित केला आहे. जगाचे भौगोलिक विभागन (zones) केले गेले, आणि भारत ९व्या विभागात (दक्षिण आशिया, पश्चिम आशिया, मध्य आशिया, मध्यपूर्व) येतो. भारताची प्रचंड लोकसंख्या (जगात दुसरी, 1.4 अब्जाहून अधिक) आणि आर्थिक महत्त्व (जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था) यामुळे भारताला दोन अंकी, साधा आणि लक्षात राहणारा कोड +91 मिळाला. 
+91 कोड कसा काम करतो?
परदेशातून भारतात फोन करताना प्रथम +91 डायल करावा लागतो, ज्यामुळे कॉल भारताच्या टेलिकम्युनिकेशन नेटवर्कवर पोहोचतो. 
ITU म्हणजे काय आणि त्याची भूमिका काय आहे?
International Telecommunication Union (ITU) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे, जी 1865 मध्ये स्थापन झाली. ती जगभरातील टेलिकम्युनिकेशन प्रणाली नियंत्रित करते, ज्यात आंतरराष्ट्रीय कॉलिंग कोड्स, सॅटेलाइट नेटवर्क्स, आणि इंटरनेट प्रोटोकॉल्स यांचा समावेश आहे. 

6
94 views