logo

प्रभासच्या मेहुण्याच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; शरद पवारांच्या पक्षातील नेत्याला अटक.....

 नागपुरातील कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील यवतमाळ मधील नेत्याला अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा ऊर्फ मुन्ना वर्मा (61) यांच्या आत्महत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

कोणाला केली अटक?

एका आरोपीला यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमधून अटक करण्यात आली असून त्याचे नाव शरद मैंद आहे. शरद पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेशी संबंधित असून यवतमाळमधील राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाचे नेताही आहे. शरद मैंदशी संबंधित पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतून वर्मा यांनी मोठे कर्ज घेतले होते. तर याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव मंजित वाडे आहे. मंजीत वाडे अवैध सावकारी करत होता. त्याने वर्मा यांना मोठ्या व्याजावर कर्ज देऊन त्याच्या वसुलीसाठी तगादा लगावला होता.

कोण होता हा कंत्राटदार?

कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:ला संपवणाऱ्या या कंत्राटदाराचं नाव पनमाचा वेंकटेश्वर वर्मा उर्फ मुन्ना वर्मा असं आहे. महाराष्ट्रामध्ये सरकारी कंत्राटदारांच्या थकबाकीचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालेला असतानाच 61 वर्षीय मुन्ना यांच्या आत्महत्येनं या चिंतेत अधिक भर घातली आहे. अनेक कंत्राटदार वाढत्या कर्जाच्या बोजामुळे नैराश्येत असल्याचं दिसत आहे. वर्मा हे श्री साई असोसिएट्स नावाच्या कंपनीच्या माध्यमातून सरकारी कंत्राटं घेऊन काम करायचे. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची काम सुरु होती. देयकं थकल्याने ते आर्थिक संकटात होते.

मित्राला दिसला लटकणारा मृतदेह

नागपूरमधील राजगनर येथील फ्लॅटमध्ये ते एकटे राहायचे. त्यांचे कुटुंबीय हैदराबादमध्ये वास्तव्यास होते. वर्मा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. वर्मा यांचे मित्र महेश बियाणी हे त्यांना भेटल्यासाठी आले असता त्यांना मित्राचा मृतदेह त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बियाणी यांनी तातडीने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. वर्मा यांच्यावर मंगळवारी सकाळी मनकापूर येथील घटावर अंत्यंसंस्कार करण्यात आले.

अभिनेता प्रभासचा मेहुणा

वर्मा हे अभिनेता प्रभासचे मेहुणे होते. वर्मा हे प्रभासची पत्नी अनुराधाचे मामेभाऊ होते. वर्मा यांचे आजोबा 1962 साली व्यावसायानिमित्त रामटेकला आले होते. वर्मा हे सार्वजनिक बांधकामाचे ठेकेदार होते. नागपूरसह गोंदिया आणि विदर्भातील वेगवेगळ्या भागांत त्यांची सरकारी कामे सुरू होती. मात्र तब्बल 40 कोटींची थकबाकी मिळण्याबाबत सरकार आणि प्रशासनाकडून काहीच आशेचा किरण दिसत नसल्याने त्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले.

जुलैमध्ये हर्षल पाटील नावाच्या कंत्राटदारानेही केलेली आत्महत्या

जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने सरकारकडे थकलेले एक कोटी 40 लाख रुपये वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने आपले जीवन संपविले होते. आता नागपुरात त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. सांगलीचे हर्षल पाटील हे ‘जलजीवन मिशन’ या सरकारने गाजावाजा केलेल्या योजनेचे कंत्राटदार होते.

ही घटना नेमकी काय आहे?
नागपूरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर वर्मा (उर्फ मुन्ना वर्मा, वय 61) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या नेत्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. सरकारी थकबाकी आणि कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे ही घटना घडली.  
मुन्ना वर्मा कोण होते आणि त्यांचा मृत्यू कसा झाला?
मुन्ना वर्मा हे श्री साई असोसिएट्स कंपनीचे मालक आणि विदर्भातील सरकारी कंत्राटदार होते. ते नागपूर, गोंदिया आणि इतर भागांत काम करत होते. 30 ते 40 कोटी रुपयांची सरकारी थकबाकी मिळत नसल्याने आणि कर्जाच्या दबावामुळे त्यांनी राजनगर येथील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मित्र महेश बियाणी यांना मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर मंगळवारी (16 सप्टेंबर 2025) मनकापूर येथे अंत्यसंस्कार झाले.
मुन्ना वर्मा यांचे प्रभासशी संबंध काय होते?
मुन्ना वर्मा हे अभिनेता प्रभासचे मेहुणे होते. ते प्रभासच्या पत्नी अनुराधाचे मामेभाऊ होते. त्यांचे कुटुंब हैदराबादमध्ये वास्तव्य करते. वर्मा यांचे आजोबा 1962 मध्ये व्यावसायानिमित्त रामटेकला आले होते. ते 30 वर्षांपासून ठेकेदारी करत होते.

97
4758 views