अमरदास नगरात धूरफवारणी व नालेसफाईची मागणी
रिसोड / प्रतिनिधी शेख शहेज़ाद – पावसाळ्यामुळे अमरदास नगर परिसरात जागोजागी पाणी साचून नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण जमा झाली आहे. त्यामुळे डास, माशांचे प्रमाण वाढून लहान मुले व नागरिक आजारी पडत असल्याने रहिवाश्यांनी चिंता व्यक्त केली आहे.याबाबत अमरदास नगर येथील नागरिकांनी नगर परिषद रिसोडचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात परिसरातील डास-माशांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी तातडीने धूरफवारणी व नाल्यांची सफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पाणी साचल्यामुळे गटाराचे स्वरूप आले असून रोगराईचे संकट वाढले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.