logo

गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचा उपक्रम : गुरव समाजातील युवक-तरुणांचा रोजगारासाठी 'समाजरत्न' उपक्रम.... भावेश गुरव यांना केले सन्मानित...

नाशिक येथे दिनांक 24 ऑगस्ट 2025 रविवार रोजी गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानची तिमाही सभा संस्थेचे विश्वस्त संजय महादू गुरव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली या सभेमध्ये गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे विश्वस्त भावेश गुरव यांचा गौरव करण्यात आला
गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे विश्वस्त भावेश रोहिदास गुरव यांच्या संकल्पनेतून "Private Job" नावाचा व्हॉट्सअ‍ॅप गट सुरू करण्यात आला आहे.या गटामध्ये गुरव समाजातील सुमारे 250 युवक-युवतींचा सहभाग असून त्यांना रोजगार संधींबाबत मार्गदर्शन केले जाते.
या उपक्रमात भावेश गुरव यांनी प्रतिष्ठानमार्फत समाजातील खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना जोडले आहे.त्यांच्या मदतीने बेरोजगार मुला-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने होत आहे.या गटाद्वारे वेळोवेळी विविध नोकरीच्या जाहिराती आणि माहिती समाजातील तरुणांना मिळत असून अनेक जणांना त्याचा थेट लाभही झाला आहे.
संस्थेने समाजातील गरजू युवक-युवतींना तत्पर रोजगारविषयक मार्गदर्शन मिळावे,तसेच नौकरी बदलतांना सामाजिक शिफारिश मिळाली तर त्यांना पगारामध्ये आर्थिक वाढ आणि कार्य पदावरही बढती मिळेल.समाजातील विविध क्षेत्रातील नौकरी वर्ग एकत्र येऊन त्यांचा वैयक्तिक अनुभव आणि क्षेत्राचे मार्गदर्शन लाभेल या हेतूने सुरू केलेल्या या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भावेश रोहिदास गुरव यांचा विशेष सन्मान गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला.
याप्रसंगी सर्व पदाधिकारी व विश्वस्तांच्या उपस्थितीत भावेश गुरव यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला.त्यांच्या या कार्याबद्दल सर्वांनी एकमुखाने अभिनंदन केले.
भावेश गुरव यांचे शिक्षण MSc. Organic Chemistry झाले आहे. प्रायव्हेट क्षेत्रात नवीन नौकरी किंवा नौकरी बदल करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे आपल्या समाजातील नौकरी वर्ग एकत्र येऊन कमीतकमी रोजगाराविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबवला आहे.या पद्धतीने समाजसेवा म्हणजे खरा “समाजरत्न” म्हणता येईल. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सदर गौरव करण्याक्षणी गुरव ज्ञानगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्माकर देवरे,उपाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी, सचिव संजय गुरव,कोषाध्यक्ष संतोष गुरव,सहसचिव भूषण गुरव,विश्वस्त संजय गुरव,सुनील गुरव,रवींद् गुरव सतीश कुवर व भावेश गुरव आदी उपस्थित होते.

70
2583 views