logo

मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन



​नांदेड,७ सप्टेंबर:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,नांदेड या कार्यालयाच्या अधिनस्त १६ वसतिगृह आहेत. या शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींकडून https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे अर्ज ऑनलाइन पद्धतीने १५ सप्टेंबरपर्यंत स्विकारण्यात येत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहे यशवंतनगर नांदेड,बिलोली,धर्माबाद,मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड,मुखेड,देगलूर,गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी नांदेड,125 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड,मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर,नायगांव व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहे भोकर,हदगांव,उमरी असे एकूण १६ शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. शासकीय वसतिगृहात निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य,निर्वाह भत्ता,ग्रंथालय,जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तेव्हा गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित जिल्ह्याचे ठिकाणी व तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून माहिती प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरून त्याची प्रिंट काढून एक प्रत संबंधित वसतिगृहाकडे सादर करावी. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त व्यावसाईक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज दि. १५ सप्टेंबर पर्यंत भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
००००००

0
0 views