
नांदेड तालुक्यात १५ सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी
एमएसडब्लू व बीएसडब्लू विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ई पीक पाहणी होणार
नांदेड, दि.५ सप्टेंबर:- ई-पीक पहाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उप विभागीय अधिकारी नांदेड डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शना नुसार
नांदेड तालुक्यात ग्रामीण भागात ई-पीक पहाणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नांदेड येथील एमएसडब्लू व बीएसडब्लूच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याबाबत या विद्यार्थ्यी यांना नियोजन भवन नांदेड येथे नविन ई-पीक पहाणी (डीसीएस) अँपचे पीपीटीव्दारे प्रशिक्षण ४ सप्टेंबर रोजी देण्यात आले.
तहसिलदार नांदेड संजय वारकड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकरी लॉगीन मधून ई पीक पाहणी पुर्ण करून घेण्याबाबत सुचना केल्या .
ई पीक पाहणीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्यावतीने सर्व बीएसडब्लू व एमएसडब्लूच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले . एका गावामध्ये एक किंवा दोन-तीन असे विद्यार्थ्यांची नेमणूक केली असून, संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्यांचे सहकार्य घेऊन ई पीक पाहणी डीसीएसव्दारे आपल्या गावातील 100 टक्के करावयाचे आहे . अशा सुचना ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मुदतीत यशस्वी करावे असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले.
विद्यार्थ्यांना या अँप व्दारे काम करतांना गाव पातळीवर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी),ग्राम पंचायत अधिकारी (ग्रामसेवक) व सहाय्यक कृषी अधिकारी (कृषीसहाय्यक) ,सरपंच,
ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील , महसूल सेवक (कोतवाल),ग्राम रोजगार सेवक,आपले सरकार सेतू संचालक व ग्राम पंचायत ऑपरेटर,सीएससी सेंटर चालक यांनी एमएसडब्लू महाविद्यालयातील नियुक्त सहाय्यक विद्यार्थ्यांना मदत करावी व मार्गदर्शन करावे अशा सुचना दिल्या. जे विद्यार्थी उत्कृष्ट कार्य करतील त्यांची प्रशासना कडून नोंद घेण्यात येईल असे सांगितले. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य मुजावर व प्राध्यापक विदयाधर रेड्डी व एस एस शिंदे यांनी महाविद्यालया तर्फे विद्यार्थ्यांकडून मुदतीत अँप व्दारे काम करून सहकार्य करू असे सांगितले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी ई पीक पहाणी डीसीएस अँप डाऊनलोड केले.या प्रशिक्षणास तहसिलदार नांदेड संजय वारकड, परिविक्षाधिन तहसिलदार अभयराज ननजुंडे,नायब तहसिलदार महसूल सुनिल माचेवाड,मंडळ अधिकारी तरोडा शिवानंद स्वामी,अ का सुरेखा सुरुंगवाड ,ग्राम महसूल अधिकारी एम के पाटिल,मनोजकुमार जाधव,दिलीप पवार व माधव शिराळे अदि उपस्थित होते.
नांदेड तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे अध्यक्ष पदाधिकारी व प्रतिष्ठित व्यक्ती यांनी एमएसडब्लूचे विद्यार्थी आल्यानंतर त्यांचे टेक्निकल मार्गदर्शन घेऊन आपल्या गावतील ई-पीक पाहणी शंभर टक्के करावी असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
००००००