
अक्कलकुवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचेच आरोग्य धोक्यात ! चिखल व पाण्याचे साचलेल्या डबक्यांमुळे रोगराईची शक्यता
अक्कलकुवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचेच आरोग्य धोक्यात ! चिखल व पाण्याचे साचलेल्या डबक्यांमुळे रोगराईची शक्यता
अक्कलकुवा प्रतिनिधी :(गंगाराम वसावे)
कृषी अधिकारी कार्यालयासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे कार्यालयाचेच आरोग्य धोक्यात आले आहे. येथे निर्माण झालेली अस्वच्छ परिस्थिती, चिखलाचे साम्राज्य आणि डासांची वाढती संख्या आरोग्यधोका निर्माण करत असून रोगराईला आमंत्रण देत आहे. मेन रोड ते कृषी अधिकारी ऑफिस जाण्यासाठी रस्ता नाही पाऊस पडला तर कार्यालयासमोर सतत पाणी साचत असल्याने याला डबक्याचे स्वरूप प्राप्त होते. पावसाच्या दिवसांमध्ये तर
ये जा करताना चिखलात अडखळणे, दुर्गंधीला सामोरे जाणे आणि डासांच्या त्रासामुळे त्रस्त होणे ही रोजची बाब झाली आहे.
कामानिमित्त कार्यालयात येणारे नागरिकही याबाबत संताप व्यक्त करत असून कृषी विभागाच्या कार्यालयाच्या परिसरातच जर डास आणि घाण असेल, तर कृषी विभाग काय उपाययोजना करतील, असे बोलून दाखवत आहेत. संबंधित प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी आणि परिसरात डास व पाण्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे