logo

एका डॉक्टरांची अनोखी कहानी असाही एक देव माणूस

पुण्यातील_एका मजुराची पत्नी प्रसूतीसाठी 🏥 रुग्णालयात दाखल झाली होती. ऑपरेशन सी-सेक्शनने झाले. मजुर बेचैन होता – किती खर्च येईल, कदाचित घरही गहाण ठेवावे लागेल, अशी भीती त्याच्या मनात होती. त्याने घाबरत डॉक्टरांना विचारले –

“डॉक्टर साहेब, काय झालं?”

डॉक्टर हसत म्हणाले – “तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे, मुलगी झाली आहे.”

“फी किती होईल?”
डॉक्टर म्हणाले – “जेव्हा लक्ष्मी जन्माला येते, तेव्हा मी काहीही फी घेत नाही.”

हा चमत्कार करणारे पुण्याचे डॉ. गणेश राख आहेत. गेली दहा वर्षे ते मुलगी जन्माला आल्यावर एकही पैसा घेत नाहीत. आतापर्यंत हजाराहून अधिक मुलींचा मोफत जन्म घडवून आणला आहे.

डॉ. राख यांच्या आईने एकदा त्यांना सांगितले होते – “बाळा, डॉक्टर होऊन आलास की मुलींचे रक्षण कर.” तीच शिकवण आज जगासाठी प्रेरणा ठरली आहे. त्यांच्या “सेव्ह द गर्ल चाइल्ड” मोहिमेने सीमा ओलांडून जागतिक स्तरावर बदलाची मशाल पेटवली आहे.

ईश्वर आपल्याला आशीर्वाद देवो, डॉक्टर साहेब. 🙏

13
664 views