logo

अक्कलकुवा तालुक्यात शेतकऱ्यांचा धडक धरणे मोर्चा


अक्कलकुवा प्रतिनिधी:(गंगाराम वसावे)
दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी नंदुरबार येथे माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित तसेच माजी खासदार डॉ. हिना गावित यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी शेतकऱ्यांनी युरिया खताचा तुटवडा, कृत्रिम टंचाई, युरिया खताची अवास्तव दराने होणारी विक्री तसेच बफर योजनेतील खताचा काळाबाजार या गंभीर विषयांवर आक्रोश व्यक्त केला.
यासंदर्भात ठरविण्यात आले आहे की, दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी अक्कलकुवा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या कार्यालयावर धडक धरणे आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात येईल*.
मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असून, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा पंचनामा तात्काळ करावा, अशी विधायक मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
या मोर्चा व धरणे आंदोलनासाठी भाजप कार्यकर्ते नागेश पाडवी, किरसिंग वसावे, नटवर पाडवी, नितेश वळवी, प्रताप दादा वसावे, सुधीर पाडवी, महेश तंवर,धनसिंग दादा वसावे, उमेश पाडवी,आकाश दादा वसावे, अशोक दादा राऊत, रोशन दादा पाडवी, भूषण पाडवी, जयमल पाडवी, अनिल पाडवी, हरिदास गोसावी, अमृत चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे.

सदर आंदोलनाला मार्गदर्शनासाठी भाजपचे जेष्ठ नेते डॉ. विजयकुमार गावित तसेच माजी खासदार डॉ. हिना गावित उपस्थित राहणार आहेत. शेतकरी बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी कळकळीची विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

55
3889 views