logo

ग्रुप ग्रामपंचायत तालंबा येथे ग्रामसभा संपन्न ,मागिल कामाचा होशोब व शिक्षण,आरोग्य, बाल विवाह‌ इ. विवीध विकास कामावर चर्चा‌ करण्यात आली

ग्रुप ग्रामपंचायत तालंबा येथे ग्रामसभा संपन्न ,मागिल कामाचा होशोब व शिक्षण,आरोग्य, बाल विवाह‌ इ. विवीध विकास कामावर चर्चा‌ करण्यात आली
अक्कलकुवा प्रतिनिधी: (गंगाराम वसावे)
दिनांक 29-08-2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत तालंबा येथे झालेल्या ग्रामसभेत उपस्थित लोकनियुक्त सरपंच कंचन प्रकाश पाडवी, ग्रामविकास अधिकारी श्रीमती गीता अरुण पाडवी, कृषी विस्तार अधिकारी किशोर अहिरे, तालुका पेसासमन्वय आशा पाडवी, उपसरपंच वनसिंग पाडवी, पोलीस पाटील उमेश वसावे, जिल्हा परिषद शाळा शिक्षक, ग्रा.प.सदस्य, अंगणवाडी सेविका आश्या वरकर आणि गावकरी उपस्थित होते. 2022 ते आजपर्यंतच्या ग्रामपंचायतीतील विविध कामांचा हिशोब सभेत सादर करण्यात आला आणि भविष्यातील विकास कामांचा ठराव मंजूर करण्यात आला‌.
ग्रामसभेतील ठळक मुद्दे
• 2022 ते 2025 पर्यंतच्या कामांचा हिशोब ग्रामपंचायतीने सभेसमोर मांडला‌.
• ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील कामे व योजना चर्चा करून गावाच्या विकासासाठी ठराव मंजूर करण्यात आले‌.
• कामांची पारदर्शकता राखून भविष्याचा विकासात्मक कटिबद्धता दर्शवली‌.
• ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामीण सहभाग व निर्णय प्रक्रिया मजबूत करण्यात आली‌.
या ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कामकाजावर चर्चा होऊन, भविष्यातील विकास कामांसाठी ठराव मंजूर केला गेला आहे‌.

23
1469 views