logo

इच्छागव्हाण गावात बैल पोळा सण उत्साहात साजरा-

*इच्छागव्हाण गावात बैल पोळा सण उत्साहात साजरा-*
अक्कलकुवा प्रतिनिधी: (गंगाराम वसावे)
पोळा हा एक शेतीशी निगडित पारंपरिक सण आहे, जो श्रावण महिन्याच्या अमावास्येला (पिठोरी अमावास्या) साजरा केला जातो. हा सण शेतकऱ्यांनी वर्षभर शेतीच्या कामात केलेल्या मदतीबद्दल बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते, ज्यामुळे शेतकरी आणि बैलांच्या नात्याला महत्त्व दिले जाते. ज्यांच्याकडे बैल नाहीत, ते मातीच्या बैलांची पूजा करतात. 

*महत्व:*
भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत बैलांचे महत्त्व अनमोल आहे. शेतीच्या कामात मदत करणारे बैल हे शेतकऱ्याचे सोबती असतात. पोळा सण याच सोबती बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. 
शेतकरी या दिवशी आपले बैल सजवतात. बैलांना सजवून त्यांची पूजा करतात, त्यांचे कौतुक करतात. ज्यांच्याकडे शेती नाही किंवा बैल नाहीत, ते मातीच्या बैलांची पूजा करतात. ग्रामीण भागात या दिवशी शाळांना सुट्टी असते, ज्यामुळे मुलेही या सणात सहभागी होऊ शकतात. हा सण शेतकऱ्यांच्या कामातील प्राण्यांचे योगदान आणि शेतकरी-प्राणी यांच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट करतो. 
या सणाच्या दिवशी बैलांची अधिक ची निगा, काळजी, सेवा चाकरी केली जाते. या बैल पोळाच्या दिवशी सर्व शेतकरी गुराच्या सणाला विशेष महत्त्व देत असतात

👤 आम्ही गावातील सर्व शेतकरी या बैल पोळा च्या दिवशी बैल धुऊन, सजवून गावात हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी बैले पुजा-आरती करणेसाठी आणतो आणि घरी असलेले इतर सर्व पाळीव प्राण्यांची पुजा केली जाते - नरेश राघू वळवी रा. इच्छागव्हाण ता.तळोदा

👤 बैल पोळा च्या दिवशी आम्ही बैल शेतात, रानात घेऊन न जाता या दिवशी सर्व शेताची कामे बंद ठेवून विश्रांती देतो- रुषीकुमार गिंबल्या वळवी, इच्छागव्हाण ता.तळोदा

22
2183 views