logo

श्रीरामपूर जिल्हा, देवळाली तालुका निर्मितीसाठी राज्यपालांना रक्ताने पत्र लिहिणार : राजेंद्र लांडगे शासनाला देवळाली तालुका करायचा नसेल तर नगरपालिकेचा उपयोग काय !

श्रीरामपूर जिल्हा, देवळाली तालुका निर्मितीसाठी राज्यपालांना रक्ताने पत्र लिहिणार : राजेंद्र लांडगे
शासनाला देवळाली तालुका करायचा नसेल तर नगरपालिकेचा उपयोग काय !

प्रतिनिधी :-ऑल इंडिया क्राईम रिपोर्टर जालिंदर आल्हाट

अहिल्यानगर जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि भीन्न भौगोलिक परीस्थितीमुळे सर्वांगीण विकास खुंटला आहे. श्रीरामपूर जिल्ह्यासाठी अनावर्ती खर्च सर्वात कमी येणार आहे. शासनाने निकष आधारे श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका तात्काळ घोषणा करावा. या सामाजिक मागणीला गती यावी म्हणून थेट राज्यपाल चंद्रपूरम राधाकृष्णन यांना रक्ताने पत्र लिहिणार असल्याचा इशारा श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती आणि पसायदान बहूउद्देशीय प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी दिला आहे.
श्रीरामपूर जिल्हा आणि देवळाली (श्रीशिवाजीनगर) तालुका सामाजिक प्रश्नाची आठवण म्हणून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देवळाली येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात झालेल्या घंटानाद आंदोलन प्रसंगी राजेंद्र लांडगे बोलत होते.
याप्रसंगी राजेंद्र लांडगे म्हणाले, सन 1982 ला देवळाली आणि राहुरीफॅक्टरी (श्रीशिवाजीनगर) मिळून ग्रामपंचायतची नगरपालिका झाली. वास्तविकता देवळाली-प्रवरा तालुका फार पूर्वीच होणं अपेक्षित होते. मध्यंतरी राहुरी तालुक्यातील 32 गावे श्रीरामपूर मतदार संघाला जोडल्यानंतर प्रगती अपेक्षित होती. मात्र एकही नवीन उद्योगधंदा आला नाही. उलट शेतीला हमीभाव मिळत नसल्याने असंख्य कुटुंबं कर्जबाजारी होऊन त्यांची क्रयशक्ती संपूष्ठात आली. या पार्श्वभूमीने शासनाला देवळाली (श्रीशिवाजीनगर) तालुका करायचा नसेल तर नगरपालिकेचा उपयोग काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.
तसेच अहिल्यानगर जिल्हा म्हणजे थोर अध्यात्मिक संतांची भूमी आहे. श्रीरामपूर जिल्हा झाल्यास अयोध्यावासी प्रभू श्रीरामाचे कर्मभूमी (युद्धभूमी) असलेल्या गोदाकाठी नव्याने श्रीराम सृष्टी निर्माण होईल. त्याच बरोबर श्रीक्षेत्र पंढरपूरच्या धर्तीवर दुर्लक्षित नेवासा तीर्थक्षेत्राचा देखील सर्वांगीण विकास होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे 750 व्या जन्मोस्तव वर्ष निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडून जिल्हा विभाजन ऐतिहासिक निर्णयाची अपेक्षा असल्याचे लांडगे यांनी शेवटी म्हटले आहे.
या घंटानाद आंदोलनात जेष्ठ नागरिक संघटनेचे सूर्यभान कदम प्रगतशील शेतकरी राम शिंदे अमित कदम चर्मकार विकास संघ जिल्हाध्यक्ष विठ्ठल देवरे अनिस पठाण राजेंद्र साळवे संतोष होले उमाकांत होले शिवनाथ परदेशी नवनाथ देसाई यशोदीप विघे अश्पाक पठाण नदीम पठाण राजेंद्र राशन निकेत संसारे समर्थ चव्हाण तेजस पगारे गोवर्धन धोत्रे आदींनी लोकसहभाग नोंदवला आहे.

88
2504 views