logo

ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कल्याणच्या या बैल बाजारात मोठमोठी जनावरे विक्रीसाठी येत.....

हा आहे कल्याणचा जुना बैल बाजार .
ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कल्याणच्या या बैल बाजारात मोठमोठी जनावरे विक्रीसाठी येत असत.त्यात प्रामुख्याने गाई, बैल, म्हशी इत्यादींचा समावेश होता. हा बैल बाजार शेतकऱ्यांसाठी तसेच जनावरे विक्री करणाऱ्या दलालांसाठी मोठी पर्वणीच होती. कालांतराने म्हणजे सुमारे गेल्या पंधरा-वीस वर्षापासून हा बैल बाजार बंद झाला आहे. अनेकांना बैल बाजार कल्याण शहरात होता , याची माहिती सुद्धा नसेल. आपण जेव्हा शिवाजी चौकातून सरळ पुढे डोंबिवली कडे जातो तेथे असलेल्या जोकर टॉकीज किंवा गुजराती शाळेच्या चौकात बैल बाजार भरत असे. सध्या तिथे इमारती झालेल्या आहेत परंतु पूर्वी मोकळी जागा होती. त्या मोकळ्या जागेतच गाई बैल व म्हशींचा मोठा व्यापार चालत असे. त्या काळात लाखोंची उलाढाल या बाजारात होत असे. शिवाय शेतीविषयी विविध अवजारे, साहित्य या बाजारात मिळत असे. सध्या जनावरे, म्हशी , गाय, बैल खरेदी करण्यासाठी लोक गुजरातच्या मेहसाणाला जातात. परंतु पूर्वी कल्याणच्या बैल बाजारात राज्याबाहेरील लोकं सुद्धा येत असत. कल्याणच्या बैल बाजारात जनावरे स्वस्तात मिळतात असा एक प्रवाद होता. आता बैल बाजार बंद झाला आहे. कल्याण शहर जसे बदलले तशा अनेक गोष्टी ऐतिहासिक ठेवे गडप झाले आहेत. यापैकीच कल्याणचा हा जुना बैल बाजार .आज आठवण येण्याचे कारण म्हणजे महापालिकेने कत्तलखाने बंदचा जो आदेश काढला आहे त्या आदेशानिमित्ताने झालेली कल्याणच्या जुन्या बैल बाजाराची एक आठवण .बैलबाजारात लाखोंचा व्यवहार होत होता. त्यावर कोणताही कर नव्हता किंवा कोणाचाही त्रास नव्हता. त्या काळातील कल्याण शहराची ती एक शान होती..... तुषार राजे

128
5573 views